प्रीमियम डिझाइनवाला Moto G85 स्वस्तात खरेदी करण्याची संधी! किंमत कमी पण फीचर्स दमदार
तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा किंवा तुमचा जुना स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा वितार करत आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला प्रिमियम डिझाईन असलेला Moto G85 स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही Moto G85 स्मार्टफोन Flipkart वरून बँक आणि एक्सचेंज ऑफरसह कमी किंमतीत खरेदी करू शकता. या स्मार्टफोन्सवर उपलब्ध असलेल्या डिल्समुळे तुम्ही हजारो रुपयांची बचत देखील करू शकता.
हेदेखील वाचा- Smartphone under 10k: अफोर्डेबल किंमतीत उपलब्ध आहेत हे बेस्ट 5G स्मार्टफोन्स, तुमच्यासाठी कोणता सर्वोत्तम?
या स्मार्टफोनमध्ये 33W चार्जिंगला सपोर्ट करणारी 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. त्याच्या 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरियंटवर ऑफर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही या स्मार्टफोन्सचे 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरियंट कमी किंमतीत खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य – X)
मोटोरोला त्यांच्या ग्राहकांना 5G स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी देत आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर या फोनची किंमत कमी झाली आहे. Motorola G85 5G स्मार्टफोन बँक आणि एक्सचेंज ऑफरसह येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे. प्रीमियम डिझाईन केलेल्या फोनमध्ये मोठा डिस्प्ले आणि पॉवरफुल प्रोसेसर आहे. कंपनीने हा फोन काही दिवसांपूर्वी Moto G84 चा उत्तराधिकारी म्हणून लाँच केला होता. हा 5G फोन प्रीमियम लेदर फिनिशसह येतो. स्मार्टफोनमध्ये कोणते फीचर्स दिले आहेत आणि खरेदीवर कोणत्या ऑफर्स दिल्या जात आहेत, याबद्दल जाणून घेऊया.
हा मोटोरोला स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून 18,999 रुपयांना खरेदी करता येईल. ही किंमत 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे. यावर 1,700 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तसेच, तुम्हाला Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1000 रुपयांची सूट मिळू शकते.
यावर फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास सूटही दिली जात आहे. Moto G85 5G स्मार्टफोन कोबाल्ट ब्लू, ऑलिव्ह ग्रीन, अर्बन ग्रे आणि व्हिवा मॅजेन्टा या चार रंगांमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करता येईल.
परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 6s Gen 3 चिपसेट बसवण्यात आला आहे. यात 6.7-इंचाचा FHD+ poOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120 Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. यासोबतच सेल्फीसाठी 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 32-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.
हेदेखील वाचा- Oppo Find X8 Mini स्मार्टफोन लाँचिंगची तयारी सुरु, 100W चार्जिंग सपोर्टसह करणार एंट्री
सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे. हे डॉल्बी ॲटमॉस आणि IP54 रेटिंगसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्ससह सुसज्ज आहे. Moto G85 स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात अपग्रेड करण्यायोग्य Android 14 ऑपरेटिंग सिस्टम आहे.
Moto G85 सारखे फीचर्स असलेले इतर अनेक फोन बाजारात आहेत. ज्यामध्ये Realme P1, Poco X6, Vivo T3X, Samsung Galaxy M35 5G आणि Realme Narzo 70 Pro यांचा समावेश आहे. त्यांची किंमतही 20 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.