गूगल मॅपवरून सीएनजी पंप आणि ईव्ही चार्जिंग स्टेशन शोधणं झालं अधिक सोपं, प्रोसेस अगदी Easy
गूगल मॅप आपल्याला सर्व ठिकाणांची माहिती उपलब्ध करून देते. आपल्या जवळचे मॉल्स, रेस्टॉरंट्स, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, पेट्रोल पंप अशा सर्व ठिकाणांची माहिती आपल्याला गूगल मॅपमधून मिळते. गूगल मॅपवर सर्व रस्ते आणि हाई वेची माहिती उपलब्ध आहे. यामुळे गूगल मॅप आपल्या प्रत्येक प्रवासाचा सोबती असतो. आपल्या सर्वांचा हाच ट्रॅवलिंग आता आपल्याला ड्रायव्हिंग मार्गावर येणारे सीएनजी पंप आणि चार्जिंग स्टेशन्सची माहिती देखील देणार आहे. गूगल मॅपच्या या सोयीमुळे तुमचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचेल. गूगल मॅपवर सीएनजी पंप आणि ईव्ही चार्जिंग स्टेशन शोधण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे.
हेदेखील वाचा- आता गुगल मॅप सांगाणार कोणता फ्लायओव्हर घ्यायचा! या 8 शहरांसाठी आलं फीचर
नेवीगेशन ॲप गूगल मापवर मॉल्स, रेस्टॉरंट्स, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, पेट्रोल पंप अशी सर्व ठिकाणे आपण शोधू शकतो. आता गूगल मॅपवार एक नविन फीचर अॅड करण्यात आलं आहे, ज्याच्या मदतीने सीएनजी पंप आणि ईव्ही चार्जिंग स्टेशन शोधता येणार आहे. त्यामुळे प्रवसावेळी तुम्ही अगदी सहज सीएनजी पंप आणि ईव्ही चार्जिंग स्टेशनची माहिती मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या ॲपवर काही सेटिंग करावी लागणार आहे. ही प्रक्रिया अगदी सोपी असून प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
हेदेखील वाचा- गुगल मॅपच्या वॉकिंग मोड फीचरबद्दल माहीत आहे का? आता क्षणार्धात समजणार रस्ता
नवीन फिचार्मुळे वापरकर्ते त्यांच्या जवळ कोणत्या प्रकारचे चार्जिंग स्टेशन उपलब्ध आहेत हे शोधण्यात सक्षम होतील. याचा अर्थ वापरकर्ते चार्जिंग स्टेशनचा प्रकार शोधण्यास सक्षम असतील.