तुमचा मुलगा युट्युबवर काय बघतोय? कंपनीने मिटवली पालकांची चिंता, लाँच झालं नवीन फीचर (फोटो सौजन्य - pinterest)
आजच्या डिजिटल युगात लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन असणं सर्वसामान्य झालं आहे. पालक कामासाठी दिवसभर बाहेर असतात आणि मुलगा घरी एकटाच असतो. याच काळजीने पालक आपल्या मुलाला स्मार्टफोन घेऊन जातात. शिवाय हल्ली मुलांचा अभ्यास देखील ऑनलाईन होतो, त्यामुळे मुलांकडे फोन असणं एक गरज बनली आहे. ज्या मुलांकडे स्वत:चा फोन नसतो, ती मुंल आपल्या पालकांच्या फोनवर तासंतास घालवतात. एवढा प्रचंड वेळ फोनवर घालवणं मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, तसेच त्यांना डोळ्यांच्या आजारांच्या समस्येशी देखील सामना करावा लागू शकतो.
हेदेखील वाचा- BGMI Update: BGMI मध्ये दिसणार दीपिका पदुकोण, Krafton ने बनवली नवी ब्रँडॲम्बेसेडर
मुलाच्या हातात स्मार्टफोन असला की पालकांच्या मनाची धाकधुक वाढते. मुलांच्या आरोग्यासोबतच आपला मुलगा फोनवर काय पाहत आहे, याची चिंता पालकांना कायम सतावत असते. कारण हल्लीच्या वाढत्या गुन्हेगारीमागे काही प्रमाणात स्मार्टफोन देखील जबाबदार आहे. स्मार्टफोमुळे अनेक गुन्हे घडल्याचं तुम्ही आजपर्यंत वाचलं असेल. यामुळे मुलाच्या हातात स्मार्टफोन दिला की पालकांची चिंता वाढते.
आपला मुलगा स्मार्टफोनवर चांगल्या गोष्टी पाहत आहे की चुकीचे व्हिडीओ पाहून वाईट मार्गाला वळत आहे, अशी चिंता पालकांना कायम सतावत असते. पालकांची हीच समस्या लक्षात घेत आता लोकप्रिय व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म युट्यूबने एक नवीन फीचर लाँच केलं आहे. पॅरेंटल कंट्रोल असं या फीचरचं नाव आहे. या नव्या फीचरमुळे पालकांची चिंता नक्कीच कमी होईल.
हेदेखील वाचा- Motorola edge50 Neo भारतात लाँच! मिळणार सुपर एचडी LTPO डिस्प्ले आणि बरंच काही, किंमत तर केवळ इतकी
सध्याची मुलं आपला मोठ्या प्रमाणात वेळ युट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहण्यासाठी खर्च करतात. आपला मुलगा YouTube वर काय पाहत आहे हे माहीत नसल्याने पालकांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढते. ही समस्या लक्षात घेऊन यूट्यूबने आता नवीन पॅरेंटल कंट्रोल फीचर आणले आहे. या फीचरमुळे पालक आपल्या मुलाच्या YouTube वरील अॅक्टिव्हिटीवर लक्ष ठेवण्यास सक्षम असतील.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन पालक नियंत्रण फीचर YouTube फॅमिली सेंटर हबचा भाग आहे. या विशेष फीचरमुळे, पालकांना त्यांच्या चॅनेलवर अपलोड केलेल्या त्यांच्या मुलांच्या व्हिडिओंची माहिती मिळू शकेल. यासोबतच या विशेष फीचरमुळे पालकांना त्यांच्या मुलांनी सबस्क्राइब केलेल्या यूट्यूब चॅनेलची माहिती मिळू शकणार आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर मुल काय कमेंट करत आहे हे पालकांनाही कळेल. जर मुलाचे स्वतःचे YouTube चॅनेल असेल आणि त्याने लाइव्ह स्ट्रीम केले किंवा त्याच्या चॅनेलवर कोणताही नवीन व्हिडिओ अपलोड केला तर पालकांना ईमेलद्वारे सूचना मिळणार आहे. आपल्या मुलाच्या युट्यूब चॅनेलवर लक्ष ठेवण्यासाठी तुम्हाला काही सोप्या टीप्स फॉलो करायच्या आहेत.