
भारतातील आघाडीचा कौशल्य-आधारित कॅज्युअल गेमिंग प्लॅटफॉर्म Zupee हा STANFEST 2024 चा टायटल स्पॉन्सर म्हणून सहयोगी भागीदार आहे. या कार्यक्रमाने 250 हून अधिक प्रमुख कंटेंट क्रिएटर्स आणि 30,000 उत्साही चाहत्यांना एकत्र आणले आहे. तसेच 500 दशलक्षांहून अधिक डिजिटल पोहोच साध्य केली आहे.
Zupee ची रोमांचक लुडो सुप्रीम मल्टी टेबल स्पर्धा विशेष आकर्षण
सर्जनशीलता, फॅंडम आणि गेमिंगचा उत्सव असलेल्या या कार्यक्रमात Zupee ची रोमांचक लुडो सुप्रीम मल्टी टेबल स्पर्धा विशेष आकर्षण ठरली. तीन फेरींच्या या स्पर्धेत 16 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये आशिष चचलानी, फुकरा इन्सान, टीम आर2एच आणि मोर्टल यांसारख्या प्रसिद्ध क्रिएटर्ससह निवडक प्रेक्षक सहभागी झाले होते. यात त्यांना त्यांच्या आवडत्या क्रिएटर्ससोबत खेळण्याची अनोखी संधी मिळाली.
स्पर्धेने भारताचे प्रभावी क्रिएटर समुदाय आणि गेमिंग प्रेमींना एकत्र आणले
या सहकार्याबाबत बोलताना Zupee चे प्रवक्ते म्हणाले, “STANFEST 2024 मध्ये झालेल्या आमच्या लुडो सुप्रीम मल्टी टेबल स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्ही खूप आनंदित झालो. या स्पर्धेने भारताचे प्रभावी क्रिएटर समुदाय आणि गेमिंग प्रेमींना एकत्र आणले. Zupee मध्ये, आम्ही कौशल्यावर आधारित असे सखोल आणि आनंददायक गेमिंग अनुभव निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. ते लोकांना जोडतात आणि प्रतिभेचा सन्मान करतात. गेमिंग उद्योगाला पुढे नेण्यासाठी आणि भारतातील गेमिंग परिसंस्था मजबूत करण्यासाठी आम्ही अशी महत्त्वपूर्ण भागीदारी करत राहू.”
स्पर्धेचा निकाल
स्पर्धेची सुरुवात चार गटांमध्ये प्रत्येकी चार खेळाडूंसह झाली. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. आशिष चचलानी, आणि मोर्टल यांसारख्या चाहत्यांच्या आवडत्या खेळाडूंना गट टप्प्यातच (पूल स्टेज) बाहेर पडावे लागले. फुकरा इन्सानविजयी झाला आणि त्याने आपला विजय दुसऱ्या खेळाडूसह वाटून घेतला. त्याने सहकार्याची खरी भावना दाखवली.
उपांत्य फेरीमध्ये आठ खेळाडूंनी दोन गटांत स्पर्धा केली आणि अंतिम फेरीसाठी चार उत्कृष्ट खेळाडू निवडले. अंतिम फेरीत, उत्कृष्ट धोरणात्मक कौशल्यांच्या जोरावर एका खेळाडूने विजय मिळवला आणि चॅम्पियनचा किताब पटकावला.
गेमिंग व्यतिरिक्त इतर स्पर्धा
गेमिंगच्या पलीकडे जात, Zupee ने प्रेक्षकांना संवादात्मक आणि गुंतवून ठेवणारा अनुभव मिळेल हे सुनिश्चित केले. अँकरने थेट प्रश्नमंजूषा घेतल्या आणि उत्साही प्रतिसाद दिल्याबद्दल सहभागींना Zupee-ब्रँडेड सिपर्स बक्षीस म्हणून दिल्या. याशिवाय, पाच सहभागींना त्यांच्या प्रभावी कामगिरीसाठी प्रीमियम स्मार्टफोन देण्यात आले.
STANFEST 2024 मधील Zupee च्या नाविन्यपूर्ण लुडो सुप्रीम मल्टी टेबल स्पर्धेच्या स्वरूपाने केवळ स्किल बेस्ड गेमिंगच्या धोरणात्मकतेचे सादरीकरण केले असे नाही तर प्रत्येक टप्प्यावर सर्वसमावेशकता आणि आनंदाला चालना देत भारतातील गेमिंग अनुभवाची पुर्नव्याख्या करण्यासाठी कंपनीची बांधिलकी देखील दर्शवली.