Garena Free Fire OB47 अपडेटची डाउनलोड लिंक लाइव्ह, नवीन कॅरेक्टर्स आणि फीचर्सनी गेम होणार अधिक मजेदार
आपल्याकडे सर्वाधिक खेळले जाणारे ऑनलाईन गेम म्हणजे फ्री फायर आणि बॅटलग्राऊंड पबजी. गेम्सच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे कंपन्या देखील या गेम्ससाठी नवीन अपडेट घेऊन येत असतात. या नवीन अपडेटमध्ये गेमर्सना नवीन फीचर्स आणि नवीन कॅरेक्टर्स अनुभवण्याची संधी मिळते. ज्यामुळे गेम अधिक मजेदार होतो. आता देखील सर्वांचा आवडता ऑनलाईन गेम फ्री फायरसाठी गरीनाने नवीन अपडेट जारी केलं आहे. या अपडेटमुळे आता गेमर्सना एक मजेदार अनुभव मिळणार आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
बॅटल रॉयल गेम Garena Free Fire MAX साठी नवीन अपडेट जारी करण्यात आले आहे. या अपडेटची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. Garena फ्री फायर गेमच्या या नवीनतम अपडेटला OB47 असे नाव देण्यात आले आहे. या अपडेटसह, गेमिंग सेटअप हिवाळ्यातील वंडरलँडमध्ये बदलणार आहे. डिसेंबर महिन्यात लाँच करण्यात आलेल्या अपडेटनंतर गेम हिवाळी थीममध्ये बदलणार आहे. गेमर्सना नवीन शहर नकाशे आणि बरेच काही एक्सप्लोअर करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
यासोबतच, हे अपडेट गेममध्ये झिपलाइन सारखे नवीन इलेक्ट्रिक इफेक्ट्स घेऊन आहे. ज्यामुळे गेम खेळताना युजर्सना एक मजेदार अनुभव मिळणार आहे.
फ्री फायररचे नवीनतम फ्री फायर MAX OB47 अपडेट 4 डिसेंबर 2024 रोजी लाईव्ह झाले आहे. फ्री फायर MAX OB47 सह, गेमर्सना गेममध्ये नवीन कॅरेक्टर्स, शस्त्रे आणि नवीन रिवार्ड देखील पाहायला मिळतील. या अपडेटच्या टीझरमध्ये कोडा या गेमच्या नवीन पात्राची झलक पाहायला मिळते. यासोबतच M590 शॉटगन, वेपन बॅलन्स ॲडजस्टमेंट, कॅरेक्टर स्किल रिवॉर्ड्स आणि बरेच काही यात पाहायला मिळणार आहे.
फ्री फायर गेमचे हे अपडेट हिवाळा आणि सणासुदीच्या इवेंट लक्षात घेऊन लाँच करण्यात आले आहे. या नवीन अपडेटमध्ये, अनेक नवीन गेमिंग थीम आणि रिवॉर्ड समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे, गेमर्सना गेम खेळताना हिवाळ्यातील थंडी आणि सुट्टीचा आनंद घेता येणार आहे. फ्री फायरचे शौकीन असलेले गेमर्स नवीन अपडेटमध्ये विंटरलँड: फ्रॉस्टी ट्रॅक, फेस्टिव्हल क्लॉक टॉवर, फ्रोझन वॉटर यासारख्या मजेदार थीमचा आनंद घेऊ शकतील.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा