गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून हत्तींचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जंगलालगतच्या भागातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात पीक घेणे कठीण झाले असून, दरवर्षी हत्तींकडून पिकांचे नुकसान होत आहे.
पाच-सहा वर्षापूर्वी ओडिशातून आलेल्या हत्तीचे बस्तान वडसा वनविभागातील कधी पोर्ला तर कधी आरमोरी वनपरिक्षेत्रात असल्याचे दिसून येते. तरीही वर्षभरात झालेल्या नुकसानीच्या घटनांपैकी केवळ ४ घटनांचा निपटारा शिल्लक आहे.
संबंधित आरोपी हे दुर्मिळ खवल्या मांजराचा उपयोग गुप्तधन शोधण्यासाठी करीत असल्याचे एका वनाधिका-याने सांगितले. माहिती मिळताच, वनाधिका-यांनी धाड टाकून कारवाई करीत सदर खवल्या मांजर ताब्यात घेतले.
ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. यात तब्बल ८ लाख ५० हजार रुपयांची सागवान लाकडे जप्त करण्यात आली आहे. यात सहा बैलगाड्या हाकणारे आणि बारा बैलांना अटक करण्यात आली आहे.
१४ जानेवारीला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जंगल परिसरात विशेष अभियान पथक कार्यरत होते. त्या पथकास नक्षली करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे यास अटक करण्यात यश आले.