Food Recipe: घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी झटपट बनवा चविष्ट पनीर कटलेट, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी
Food Recipe: दिवाळीच्या सुट्टीमध्ये पाहुणे आणि मित्रमंडळी सगळ्यांच्या घरी येतात. पाहुणे आल्यानंतर त्यांना दिवाळीत फराळीत विविध पदार्थ खाण्यास दिले जातात. पण गोड पदार्थ खाण्याचा कंटाळा आल्यानंतर नेमकं काय बनवावं सुचत नाही. अशावेळी तुम्ही झटपट पनीर कटलेट बनवू शकता. पनीरपासून बनवलेले पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. याशिवाय चवीला चांगले लागणारे पनीर शरीरासाठी सुद्धा गुणकारी आहे. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तुम्ही पनीर कटलेट बनवून शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. पनीर कटलेट तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता. फराळातील तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास पनीरपासून नवनवीन पदार्थ बनवावेत. चला तर जाणून घेऊया पनीर कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






