गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील दोन वनरक्षकांवर माओवाद्यांनी जबर हल्ला केला होता. जानेवारी २०२२ रोजी नारगुंडा परिसरात दोन वनरक्षकांना बेदम मारहाण करून त्याचे मोबाईल आणि जीपीएस यंत्र हिसकावून घेण्यात आले. या घटनेमुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली होती. तरी, या गुन्ह्यात सहभागी असलेला जहाल नक्षली करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश मिळाले आहे. जिल्हयातील अनेक हिंसक घटनांमध्ये त्याचा सहभाग आहे. त्याच्यावर आतापर्यंत एकुण १६ गुन्हे दाखल आहेत. [blurb content=””]






