धार्मिक महत्त्व आणि अद्भुत सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भारताच्या 'या' 5 जैन मंदिरांना एकदा नक्की भेट द्या
भारत आपल्या ऐतिहासिक वास्तूंसाठी जगप्रसिद्ध आहे. देशात जागोजागी धार्मिक मंदिर पाहायला मिळतात. अनेक भाविक मंदिरात जाऊन देवाचे नामस्मरण करतात. देशात अनेक देवी-देवतांचे मंदिर वसलेले आहेत मात्र जर तुम्हाला जैन मंदिरात जायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील प्रसिद्ध पाच जैन मंदिरांबद्दल सांगणार आहोत, जिथली वास्तुकला आणि कलाकृती तुमचे मन जिंकेल. या मंदिरांना भेट दिल्यानंतर तुम्हाला जैन धर्माचा इतिहास आणि संस्कृतीची माहिती मिळेल. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
भारतातील दोन सर्वात प्रसिद्ध जैन मंदिरे राजस्थानमध्ये आहेत. पहिले रणकपूर जैन मंदिर, जे केवळ राजस्थानच नाही तर संपूर्ण भारतातील प्रसिद्ध मंदिर आहे. तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासह येथे पोहोचू शकता. हे मंदिर राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील अरवली डोंगराच्या मधोमध बांधले आहे. जिथे तीर्थंकर ऋषभनाथांची पूजा केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार, या मंदिरात 1444 खांब असून त्याचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे.
याशिवाय राजस्थानमधील आमेर जैन मंदिर हे प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे, जे जयपूरजवळ बांधले आहे. या मंदिराची अतिशय सुंदर सजावट करण्यात आली आहे. लाखो लोक येथे भेट देण्यासाठी येतात. मिळालेल्या माहितीनुसार, येथील भिंतींवर बारीक कोरीव काम करण्यात आले आहे. या मंदिरात भगवान पार्श्वनाथांच्या सुंदर मूर्ती आहेत. इतकेच नाही तर, या मंदिराच्या आजूबाजूला सुंदर उद्यानदेखील पाहायला मिळेल.
हेदेखील वाचा – Amrit Udyan: राष्ट्रपती भवनाचे अमृत उद्यान उघडले, तिकीट-वेळ सर्व गोष्टी जाणून घ्या
तेलंगणा राज्यातील कल्पकजी मंदिर नलगोंडा जिल्ह्यात आहे, जे प्रसिद्ध जैन मंदिरांपैकी एक मानले जाते. हे मंदिर ऋषभदेवांना समर्पित आहे. हे मंदिर अनेक राज्यकर्त्यांनी बांधले आहे. म्हणजेच याचा इतिहास खूप जुना मानला जातो. मंदिराचे सौंदर्य पाहून तुम्हाला इथून पुन्हा घरी जावेसे वाटणार नाही.
गुजरातमधील पालिताना जैन मंदिर एक पवित्र जैन तीर्थक्षेत्र आहे, हे मंदिर भावनगर जिल्ह्यात वसले आहे. येथे शत्रुंजय टेकडीवर 863 हून अधिक जैन मंदिरे आहेत. जगातील सर्वात मोठ्या जैन मंदिरांमध्ये या ठिकाणाची गणना केली जाते. येथे प्रत्येक धर्माचे लोक मोठ्या संख्येने डोंगर चढून दर्शन घेण्यासाठी येतात. इथून सुंदर निसर्गसौंदर्याचे दर्शन घडते.
कर्नाटक राज्यातील श्रवणबेळगोला येथे प्राचीन गोमटेश्वर जैन मंदिर वसलेले आहे. हे मंदिर बाहुबलीला समर्पित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मंदिरात भगवान बाहुबलीची 18 मीटर उंचीची मूर्ती आहे, जी संपूर्ण जगातील सर्वात उंच मूर्ती मानली जाते. या मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी भारतातूनच नव्हे तर जगभरातून लोक येतात. तुम्ही या सर्व जैन मंदिरांना भेट देऊन देवाचे दर्शन घेऊ शकता. येथे तुम्हाला शांत वातावरण आणि सुंदर नैसर्गिक दृश्ये पाहायला मिळतील.