
पुण्यातील ठिकाणे (फोटो सौजन्य - iStock)
पुणे हे महाराष्ट्रातील लोकप्रिय शहर आहे. ‘पुणे तिथे काय ऊणे’ असंही म्हटलं जातं. या शहराचे वैशिष्टय़ म्हणजे या शहराच्या आजूबाजूला अनेक अद्भुत ठिकाणे आहेत जिथे तुम्ही आरामशीर वेळ घालवू शकता. विकेंड प्लॅनिंगसाठी येथे अनेक अशा ठिकाणांना भेट देता येते, जेणेकरून तुम्हाला रिफ्रेश वाटते. विशेषतः पावसाळ्यात तुम्हाला पुण्याला जायचे असेल तर आम्ही या लेखातून अशी काही ५ ठिकाणे सांगत आहोत, जी तुमच्या मनाला नक्कीच सुखद अनुभव मिळवून देतील.
पुणे शहरात गेल्यानंतर या ठिकाणांना भेट दिल्याशिवाय तुम्ही येऊ नका. पुण्यामध्ये अनेक सौंदर्यपूर्वक अशी ठिकाणे आहेत आणि त्याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पावसाळ्यात पुणे आणि आसपासच्या परिसराचे दृश्य पूर्णपणे बदलून जाते. येथील नैसर्गिक सौंदर्य कोणालाही भुरळ घालू शकते. पुण्याच्या आसपास असलेल्या काही लोकप्रिय पर्यटन स्थळांबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
सिंहगड
सिंहगड (फोटो सौजन्य – iStock)
पुण्यापासून सुमारे 35-40 किलोमीटर अंतरावर सिंहगड आहे. येथील किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. हा किल्ला डोंगराच्या माथ्यावर आहे. देव टाकी हा जलकुंभ पाहण्यासाठी पर्यटकही येथे येतात. ट्रेकिंगची आवड असलेले लोकही येथे भेट देतात. सिंहगड परिसर नेहमीच गजबजलेला असतो मात्र पावसाळ्यात हा पाहायला अधिक मजा येते.
पानशेत
पानशेत धरण (फोटो सौजन्य – iStock)
पुण्याच्या आसपासची बहुतेक पर्यटन स्थळे हिल स्टेशन्स आहेत. पानशेत हेदेखील हिल स्टेशन आहे आणि तुम्ही येथे वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. या हिल स्टेशनवर कुटुंबासह वेळ घालवणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. येथे तुम्हाला साहसी उपक्रमांचीही संधी मिळते. वेगवेगळे पर्याय इथे उपलब्ध आहेत. मुंबईपासून बऱ्यापैकी जवळ असणारे हे स्थळ तुम्हाला पावसाळ्यात अधिक आनंद देते.
लोहगड
लोहगडचा किल्ला (फोटो सौजन्य – iStock)
सिंहगड किल्ल्याप्रमाणे लोहगड किल्ल्यालाही विशेष महत्त्व आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानीही होता. वीकेंडसाठी तुम्ही विचार करत असाल तर इथे वेळ घालवता येतो. भाजा आणि कार्ला लेणीही येथील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. आजही इथे गेल्यानंतर एका वेगळ्यात विश्वात असल्याची जाणीव होते.
तोरणा
तोरणा किल्ला (फोटो सौजन्य – iStock)
जर तुम्ही एतट्याने प्रवास करत असाल आणि ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही तोरणालाही भेट देऊ शकता. पुण्यापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या तोरणाला प्रचंडगड म्हणूनही ओळखले जाते. हा जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला असून सुमारे दीड किलोमीटर परिसरात पसरलेला आहे. येथे जाण्यासाठी झुजर माची आणि बुधला माचीचा ट्रेक करावा लागतो.
लोणावळा
लोणावळ्याचा रम्य परिसर (फोटो सौजन्य – iStock)
लोणावळा हे अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पुण्यापासून त्याचे अंतर सुमारे 66 किलोमीटर आहे. पुण्याहून साधारण २ तासांच्या अंतराने लोणावळ्याला पोहोचता येते. हे या भागातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. इथला विकेंड म्हणजे कायम लक्षात राहण्याजोगा असतो. पावसाळ्यात खाली उतरणारे ढग, हिरवळ यामुळे लोणावळा अधिक सुंदर दिसते. तसंच तुमचे मन अधिक ताजेतवाने होते.