Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sleep tourism साठी भारतातील ‘ही’ ठिकाणे आहेत खूप सुंदर; तणाव कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय

आजकाल sleep tourism चा खूप ट्रेंड वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही या सुंदर ठिकाणी जाऊन निसर्गाच्या सानिध्यात चांगली झोप घेऊ शकता.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 20, 2024 | 05:00 PM
Sleep tourism साठी भारतातील 'ही' ठिकाणे आहेत खूप सुंदर

Sleep tourism साठी भारतातील 'ही' ठिकाणे आहेत खूप सुंदर

Follow Us
Close
Follow Us:

आजकाल sleep tourism चा खूप ट्रेंड वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही या सुंदर ठिकाणी जाऊन निसर्गाच्या सानिध्यात चांगली झोप घेऊ शकता. जीवनाच्या धकाधकीच्या वेगापासून स्वत:ला वेळ देणे आणि स्वत:ला रिचार्ज करणे याला झोपेचे पर्यटन म्हणतात. झोप हा एकमेव मार्ग आहे जो आपले मन शांत करतो आणि मानसिक आरोग्य सुधारतो. या प्रवासानंतर थकवा दूर करण्यासाठी तुम्हाला सुट्टी किंवा विश्रांती घेण्याचीही गरज नाही. यामुळे आज आम्ही तुम्हाला भारतातील काही अशी अनेक ठिकाणे सांगणार आहोत जिथे तुम्ही झोपेच्या आनंद घेऊ शकता आणि मानसिक ताण कमी करू शकता.

चला तर मग जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल…

हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील पर्वतरांगांमध्ये स्लीप टुरिझमसाठी आदर्श वातावरण आहे. मनाली, शिमला, आणि कुल्लूसारख्या ठिकाणी थंड हवामान, शांत परिसर, आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून योग, ट्रेकिंग, फिशिंगसारख्या क्रियाकलापांचा आनंद तुम्हाला घेता येईल. या ठिकाणी तुम्हाला निसर्गाच्या मधुर आवाजात आणि शांत वातावरणात झोपण्याचा विलक्षण अनुभव मिळेल.

गोवा

गोवा हे स्लीप टुरिझमसाठी भारतातील अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले रिसॉर्ट्स आयुर्वेदिक मसाज, ध्यान, आणि निसर्गाच्या सानिध्यात झोपेच्या क्रियाकलापांची सुविधा पुरवतात. शांत समुद्राची गाज, सोनेरी वाळू, आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना उत्तम झोप आणि मानसिक शांती मिळते.

हे देखील वाचा- परफेक्ट ऑफबीट बीच व्हेकेशनसाठी भारतातील ‘या’ 5 ठिकाणांना नक्की भेट द्या; प्रवास होईल रोमांचकारी

दक्षिण भारत

तमिळनाडू, केरळ, आणि म्हैसूरसारख्या ठिकाणांमध्ये हिरवीगार डोंगररांगा आणि ढगांच्या चादरीखाली आरामशीर झोपेचा आनंद घेता येतो. कूर्ग आणि मुन्नारमध्ये आयुर्वेदिक उपचार आणि ध्यानाची सुविधा पुरवणारी रिसॉर्ट्स आहेत यांना भेट देऊ शकता. निसर्गाच्या सानिध्यात शांतपणे झोपल्याने मानसिक ताण दूर होण्यास मदत होते.

ऋषिकेश

भारताची योगनगरी म्हणून ओळखले जाणारे ऋषिकेश स्लीप टुरिझमसाठी आदर्श ठिकाण आहे. येथील शांत, स्वच्छ वातावरण आणि गंगा नदीच्या काठावरील परिसरात योग, ध्यान, आणि आयुर्वेदिक उपचारांचा अनुभव घेतला जाऊ शकतो. ऋषिकेशचा प्रवास इतर ठिकाणांच्या तुलनेत स्वस्त असून, येथे झोपल्याने मानसिक शांतता मिळते.

ही ठिकाणे तणाव कमी करण्यासाठी आणि उत्तम झोपेसाठी सर्वोत्तम ठरू शकतात, ज्यामुळे तुम्हाला पूर्णतः रिचार्ज होण्याचा अनुभव मिळेल.

हे देखील वाचा- भारतातील ‘या’ राजेशाही किल्ल्यांचे दृश्य तुम्हाला मंत्रमुग्ध करेल; एकदा नक्की भेट द्या

Web Title: Beautiful places in india for sleep tourism nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2024 | 05:00 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…
1

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…

व्हेनेझुएलावर हल्ला, Maduro अटकेचा भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम; काय म्हणाले डॉ. शैलेंद्र देवळाणकर?
2

व्हेनेझुएलावर हल्ला, Maduro अटकेचा भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम; काय म्हणाले डॉ. शैलेंद्र देवळाणकर?

Simple Energy : भारतातील पहिली ई-स्कूटर लाँच, ४०० किमी रेंज देणारी ‘ही’ स्कूटर ठरू शकते गेमचेंजर
3

Simple Energy : भारतातील पहिली ई-स्कूटर लाँच, ४०० किमी रेंज देणारी ‘ही’ स्कूटर ठरू शकते गेमचेंजर

India Manufacturing iPhone: ‘मेक इन इंडिया’चा मोठा चमत्कार; भारतातून आयफोन निर्यात ५० अब्ज डॉलर्स पार
4

India Manufacturing iPhone: ‘मेक इन इंडिया’चा मोठा चमत्कार; भारतातून आयफोन निर्यात ५० अब्ज डॉलर्स पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.