पावसाळ्यात नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या रत्नागिरीतील 'या' सुंदर ठिकाणांना जरूर भेट द्या
नुकताच पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत अनेक ठिकाणांचे सौंदर्य आणखीनच बहरून येते. पावसाळ्यात अनेकजण फिरायला जाण्याचा विचार करत असतात. फिरण्यासाठी हा एक परफेक्ट ऋतू मानला जातो. या पावसाळ्यात जर तुम्हीही कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर रत्नागिरी तुमच्यासाठी एक उत्तम स्पॉट ठरू शकतो. निसर्गमय वातावरण, शांतता आणि ऐतिहासिक वस्तूंनी युक्त रत्नागिरी तुमच्या विकेंडची मजा द्विगुणित करेल. आज आम्ही तुम्हाला रत्नागिरीतील काही फेमस आणि सुंदर ठिकाणांविषयी माहिती सांगत आहोत. रत्नागिरीला जाण्याचा विचार करत असाल तर हे स्पॉट्स तुमच्या लिस्टमध्ये असायलाच हवेत.
पावसाळ्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासह रत्नागिरीतील काही फेमस ठिकाणांना भेट देऊ शकता. रत्नागिरी हा महाराष्ट्रातील एक सुंदर जिल्हा आहे, जिथे समुद्रकिनारे, नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक ठिकाणे तुम्हाला आकर्षित करतील. चला जाणून घेऊया रत्नागिरीतील काही उत्तम ठिकाणांबद्दल.
जर तुम्ही रत्नागिरीला जाण्याचा विचार करत असाल, तर रत्नागिरीपासून हाकेच्या अंतरावर असलेली तीर्थ गंगा ही एक पवित्र नदी आहे, जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबासह नदीच्या काठावर बसून सुंदर नैसर्गिक दृश्याचा आनंद घेऊ शकता. एवढेच नाही तर या नदीत तुम्ही स्नानही करू शकता.
याशिवाय तुम्ही महाड शहरात फिरायला जाऊ शकता. हे रत्नागिरीपासून काही किलोमीटर अंतरावर आहे. येथे तुम्ही साईबाबांच्या मंदिरालाही भेट देऊ शकता. रत्नागिरीला येऊन जर तुम्ही गणपतीपुळ्याला गेला नाही तर तुमच्या रत्नागिरीत जाण्याचा काही उपयोग नाही. गणपतीपुळे हा रत्नागिरीचा सर्वात लोकप्रिय समुद्रकिनारा आहे. समुद्राच्या लाटांचा आनंद लुटण्यासाठी दूरदूरवरून लोक येथे येतात. तुम्ही समुद्रात डुंबू शकता, सनबाथ घेऊ शकता आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटू शकता.
हेदेखील वाचा – जन्माष्टमीच्या दिवशी, भारतातील ‘या’ 5 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिरांना नक्की भेट द्या
तुम्हाला ऐतिहासिक ठिकाणे पाहण्याची खूप आवड असेल, तर तुम्ही रत्नागिरीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विजयदुर्ग किल्ल्याला भेट देऊ शकता. हा किल्ला समुद्र किना-यावर बांधला आहे, जिथून तुम्हाला समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. या जागेचे सौंदर्य पाहताच तुम्हाला येथून पुन्हा घरी जावेसे वाटणार नाही.
याशिवाय तुम्ही भटयेश्वर मंदिर, जयती, भगवती तलाव, माळशेज घाट आणि रत्नागिरीजवळील रेवदंडा किल्ल्यालाही भेट देऊ शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबासह रत्नागिरीतील या सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता आणि ही सहल अविस्मरणीय बनवू शकता. इतकेच नाही तर, रत्नागिरीत तुम्ही पर्वत, जंगल, ट्रेकिंग अशा अनेक ऍक्टिव्हिटीजचा आनंद घेऊ शकता.