सम्राट आणि राणीच्या स्मरणार्थ बांधला गेला 'गेटवे ऑफ इंडिया', अनोखा इतिहास माहिती आहे का? जाणून घ्या
मुंबई म्हटलं की, आपसूक मुंबईच्या प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक गेटवे ऑफ इंडियाचे दृश्य डोळ्यासमोर येत. कोणी मुंबईला आले आणि गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली नाही असे कधीही होत नाही. देश विदेशातून लोक भारतात आले की आवर्जून या ठिकाणाला भेट देतात. मात्र हा गेट नक्की का बांधण्यात आला आणि यांचे निर्माण कोणी केले, याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला गेटवे ऑफ इंडियाचा रंजक इतिहास सांगत आहोत.
मुंबईत अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. हे शहर ऐतिहासिक वास्तूंनी भरलेले आहे. असेच एक ठिकाण मुंबईतील कुलाबा येथे आहे, ज्याचे नाव गेटवे ऑफ इंडिया आहे. याचा अर्थ ‘भारतात प्रवेश करण्याचे प्रवेशद्वार’ असा होतो. हा एक मोठा दरवाजा आहे, ज्याचा इतिहास खूप मनोरंजक आहे. या गेटच्या एका बाजूला मुंबई शहर आहे, तर दुसऱ्या बाजूला समुद्र आहे, तिथून एलिफंटा बेटावर जाण्याची वाट आहे. त्याची पायाभरणी 1920 मध्ये पूर्ण झाली, तर बांधकाम 1924 मध्ये पूर्ण झाले.
हेदेखील वाचा – दोन राज्यात विभागले गेले आहे भारताचे हे रेल्वे स्टेशन, अमिताभ बच्चनच्या KBC मध्ये झाला खुलासा, वाचा सविस्तर
गेटवे ऑफ इंडिया हे सम्राट जॉर्ज पंचम आणि पत्नी राणी मेरी ऑफ टेक यांच्या मुंबईत आगमनाच्या स्मरणार्थ बांधले गेले होते. ब्रिटिश राजाची ही पहिलीच भारत भेट होती. तथापि, त्याला केवळ स्मारकाचे कार्डबोर्ड मॉडेल पाहण्यास मिळाले, कारण 1915 पर्यंत बांधकाम सुरू झाले नव्हते. गेटवे बांधण्यापूर्वी अपोलो बंदर हे स्थानिक मासेमारीचे ठिकाण होते.
हेदेखील वाचा – UP’च्या या शहरात वसला आहे 5500 वर्षे जुना प्राचीन कंस किल्ला, वाचा आणि जाणून घ्या
गेटवे ऑफ इंडिया सम्राट जॉर्ज विटेट यांनी बांधला होता. गेटवेच्या कमानीची उंची 26 मीटर (85 फूट) आहे आणि त्याच्या मध्यवर्ती घुमटाचा व्यास 15 मीटर (49 फूट) आहे. त्यावेळी ते बनवण्यासाठी एकूण 21.13 लाख रुपये खर्च करण्यात आला होता. हे स्मारक पिवळे बेसाल्ट आणि प्रबलित काँक्रीटचे बनलेले आहे. आजच्या काळात दररोज लाखो लोक दर्शनासाठी येतात.
या गेटच्या समोरच भारतातील प्रसिद्ध हॉटेल ताज आहे. या दोन प्रसिद्ध इमारतींमध्ये फारसे अंतर नाही. त्यामुळेच दूरदूरवरून लोक या ठिकाणांना भेट द्यायला येत असतात. इथे एकाच वेळी दोन ऐतिहासिक ठिकाणे पाहता येतात.