IRCTC चे हिमाचल टूर पॅकेज आहे खूप स्वस्त
पावसाळा सुरू होताच लोक अनेकजण सुंदर हिल स्टेशनवर जाण्याचा विचार करतात. पावसाळ्यात फिरण्यासाठी भारतात अनेक सुंदर ठिकाणे आहेत. आणि हिमाचल हे त्यापैकीच एक आहे. हिमाचल प्रदेश प्राकृतिक निसर्गसौंदर्याने नटलेले एक लोकप्रिय असे प्रेक्षणीय स्थळ आहे. हिमाचलमधील बर्फाळ प्रदेश तर तिथली खास शोभा वाढवतो. हिमाचल प्रदेश भारतातील सफरचंदाच्या विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. हिमाचल हा भाग सफरचंदाच्या व्यापाराचा एक प्रमुख उत्पादक आहे आणि त्यांच्या हिमाचली रेड डिलिशियस आणि रॉयल डिलिशियस या आपल्या स्वादिष्ट सफरचंदाच्या प्रकारांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच इथल्या शाली, कपडे, इथले हिमाचल लोक आणि सर्वात महत्त्वाचं निसर्गसौंदर्य यामुळे हिमाचलमध्ये जगभरातून लोक येत असतात. आणि IRCTC घेऊन आलाय एक स्वस्त आणि भन्नाट टूर पॅकेज. जाणून घ्या कोणते ते.
निसर्गसौंदर्याने नटलेला एव्हरग्रीन हिमाचल
आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजचे नाव एव्हरग्रीन हिमाचल आहे. हे टूर पॅकेज हावडा येथून सुरू होणार आहे. ही संपूर्ण ट्रिप फक्त 25,700 रुपयांमध्ये पूर्ण होईल. या संपूर्ण टूर पॅकेजमध्ये तुम्ही डलहौसी आणि मॅक्लॉडगंज कव्हर करू शकता.
प्लॅन इतक्या दिवसांचा आहे
याशिवाय ही एव्हरग्रीन हिमाचल ट्रिप 7 रात्री आणि 8 दिवसात पूर्ण होईल. या टूर पॅकेजद्वारे तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह किंवा मित्रांसह हिमाचलच्या सहलीला जाऊ शकता. या सहलीत तुम्हाला अनेक गोष्टी एक्सप्लोर करायला मिळतील आणि खूप आनंद लुटता येईल.
निवास आणि भोजन व्यवस्था
आयआरसीटीसीच्या या पॅकेजमध्ये सर्व पर्यटकांची निवास आणि भोजन व्यवस्था मोफत असेल. म्हणजे केवळ 25,700रुपये भरल्यानंतर निवास आणि भोजनासाठी कोणताही वेगळा खर्च करावा लागणार नाही. यामध्ये तुमचा सकाळचा नाश्ता, रात्रीचे जेवण आणि दुपारचे जेवण देखील समाविष्ट असेल. हे टूर पॅकेज ‘देखो अपना देश’ अंतर्गत सुरू करण्यात आले आहे. जे दर मंगळवारी सुरू होईल.
कसे कराल बुकिंग
या टूर पॅकेजबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही IRCTC च्या अधिकृत पर्यटन वेबसाइट ला भेट देऊ शकता.