फ्लाइट्स आणि हॉटेल्सचे बुकिंग झाले फुल्ल
जेव्हा आपल्याला कुठेतरी छान असा प्रवास करण्याची इच्छा असते तेव्हा आपण सर्वचजण ऑफिसमधून एखाद्या लाँग वीकेंडची वाट पाहत असतो. यावेळी स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट गुरुवारी येत आहे. जर तुम्हाला 16 तारखेला (शुक्रवारी) सुट्टी मिळाली तर तुम्हाला पुढील 2 दिवस सुट्टी असेल आणि त्यानंतर 19 ऑगस्टला रक्षाबंधनही आहे. म्हणजे तुम्हाला सलग ५ दिवस कामावरून सुट्टी घेता येईल. याशिवाय 26 तारखेला जन्माष्टमी असल्याने 24 ते 26 ऑगस्टचे नियोजनही करता येईल.
जर तुम्हीदेखील स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधनाच्या आसपास सुट्टीचे नियोजन करत असाल तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो कारण जगभरातल्या आणि देशातल्या प्रमुख पर्यटन स्थळांवर गर्दी वाढण्याची शक्यता आहे. पर्यटकांनी प्रेबुकिंग करून ठेवल्यामुळे फ्लाइट्स आणि हॉटेल्सचे बुकिंग हे फुल झाले आहे.
प्रवासाची आवड असलेल्या लोकांनी तर या लाँग वीकेंडचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा. म्हणून त्यांनी तर आपल्या स्वप्नांच्या ठिकाणी सुट्टीचे नियोजन करायला हवे. ट्रॅव्हल कंपन्या आणि विमान कंपन्यांनीही या संधीचा फायदा करून घेण्यास सुरुवात केली आहे. ते ग्राहकांना त्यांच्या टूरचे नियोजन करण्यासाठी प्रमोशन करत आहेत. याव्यतिरिक्त लोकप्रिय पर्यटन स्थळांना जाण्यासाठीच्या फ्लाइटच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि बहुतेक हॉटेल्स पूर्णपणे बुक झालेली आहेत. उड्डाणे आणि गाड्यांचे भाडे यांबरोबरच गाड्यांची तिकिटेही मिळणे कठीण झाले आहे.
टॉप टुरिस्ट डेस्टिनेशन
अशा हवामानात पर्यटक बहुतेक हॉटेल्सचे बुकिंग करतात ज्यात स्विमिंग पूल आणि स्पा सुविधा आहेत. मुख्य देशांतर्गत पर्यटन स्थळांमध्ये गोवा, उदयपूर, ऋषिकेश, जयपूर, लोणावळा, महाबळेश्वर आणि उटी यांचा समावेश होतो. जर आपण आंतरराष्ट्रीय ठिकाणांबद्दल बोललो तर त्यात मालदीव, श्रीलंका, दुबई, इंडोनेशिया, थायलंड, तुर्की, भूतान आणि अझरबैजान यांचा समावेश आहे.
फॉरेस्ट हॉलिडे
जंगल सफारीबद्दल सांगायचे तर राजस्थानच्या रणथंबोर नॅशनल पार्क, सरिस्का नॅशनल पार्क आणि उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील बहुतेक रिसॉर्ट्स देखील पूर्णपणे बुक आहेत. पर्यटकांनी लाँग वीकेंडला ट्रिप प्लॅनिंग करून वीकेंड मजेत साजरा व्हावा याची पूर्ण तयारी करून ठेवली आहे. आणि त्याचा लाभ घेण्यासाठी टूर ऑपरेटरही मागेपुढे पाहत नाहीत.
क्रूझ बुकिंग वाढले
समुद्रात फिरण्याची आवड असलेल्या लोकांनीही क्रूझमध्ये बुकिंग वाढवले आहे. ही लक्झरी जहाजे गोवा, कोची, लक्षद्वीप आणि अगदी श्रीलंकेला टूर देतात. ज्यांना महाग क्रूझ परवडत नाही आणि ते बजेट शिप पर्याय निवडत आहेत. ऑगस्टमध्येही समुद्रात मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार हे उघड आहे.
ऑफरचा लाभ घ्या
लाँग वीकेंडमुळे अनेक टूर ऑपरेटर्सनी त्यांच्या पॅकेजच्या किमती वाढवल्या आहेत यात शंका नाही, पण अशा अनेक ट्रॅव्हल एजन्सी आहेत ज्या त्यांच्या ग्राहकांना आकर्षक ऑफर देत आहेत. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता, जेणेकरून ही सुट्टी संस्मरणीय बनवता येईल.