भारतीय रेल्वेकडून सुवर्णसंधी! आता परवडणाऱ्या किमतीत घेता येईल लक्झरी क्रूझचा आनंद, कसं बुक कराल टूर पॅकेज?
निळ्याशार समुद्रात, लाटांच्या सानिध्यात आणि शांत वातावरणात आपल्या प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवावा अशी प्रत्येकाची इच्छा सांगते. आपल्यापैकी प्रत्येकाने चित्रपटात किंवा व्हिडिओत क्रूझ पाहिली असावी. हा एक अद्भुत अनुभव आहे, मात्र खर्चिकही तितकाच. पण आता चिंता करण्याची गरज नाही कारण भारतीय रेल्वे सर्वांसाठी आता एक खास टूर पॅकेज घेऊन आली आहे. यात प्रवासी परवडणाऱ्या किमतीत लक्झरी क्रूझचा आनंद लुटू शकतात. पॅकेजमध्ये प्रवास, निवास, जेवण आणि जहाजावरील मनोरंजन सुविधा उपलब्ध आहेत. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊयात .
IRCTC चे लक्झरी क्रूझ टूर पॅकेज
जेव्हाही आपल्याला कुठे फिरायला जायचे असते तेव्हा बहुतेक लोक हे टूर पॅकेज सेलेक्ट करतात. हे ग्रुप बुकिंगवर कमी किमतीत अनेक सुविधा मिळवून देते. भारतीय रेल्वे प्रवाशांना खासगी कंपन्यांकडून पॅकेज सुविधाही देत आहे. भारतीय रेल्वेच्या सामान्य पॅकेजबद्दल अनेकांना माहिती आहे पण क्रूझ पॅकेजविषयी अनेकांना फार काही ठाऊक नाही अशात आज आम्ही तुम्हाला याबाबत तपशीलवार माहिती सांगत आहोत. भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर, तुम्हाला सर्व टूर पॅकेजविषयी माहिती मिळून जाईल.
Stressful Cities: हृदय कमकुवत असेल तर या शहरांना कधीही भेट देऊ नका, साहस प्रेमींसाठी खास
IRCTC चे लक्झरी क्रूझ टूर पॅकेज कसे बुक करावे?
भारतीय रेल्वेच्या वेब साइटवरून येईल मेल
यासाठी तुम्हाला यात तुमचा ईमेल आयडी, तुमचे नाव, नंबर, किती लोक प्रवास करणार आहेत आणि मुलेही तुमच्यासोबत जाणार आहेत की नाही अशी माहिती द्यावी लागेल. सर्व माहिती दिल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून एक मेल येईल. या मेलमध्ये तुम्हाला एक रेफरन्स नंबर येईल. यानंतर तुम्हाला भारतीय रेल्वेकडून कॉल येईल. त्यानंतर तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून टूर पॅकेज बुक करू शकाल.