Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel: ऑक्टोपस आईस्क्रीमपासून ते Cuddle Cafe पर्यंत अशा विचित्र गोष्टी फक्त जपानमध्येच पाहायला मिळतील

जपानी लोक आपली संस्कृती, प्रथा तसेच क्रिएटिविटीसाठी जगभर ओळखले जातात. यात अशाही काही आविष्कारांचा किंवा ट्रेंडचा समावेश ज्यांना ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. या विचित्र गोष्टी तुमाझी फक्त जपानमध्येच पाहू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 01, 2024 | 09:38 AM
Travel: ऑक्टोपस आईस्क्रीमपासून ते Cuddle Cafe पर्यंत अशा विचित्र गोष्टी फक्त जपानमध्येच पाहायला मिळतील

Travel: ऑक्टोपस आईस्क्रीमपासून ते Cuddle Cafe पर्यंत अशा विचित्र गोष्टी फक्त जपानमध्येच पाहायला मिळतील

Follow Us
Close
Follow Us:

जपान हा एक असा देश आहे जो त्याच्या क्रिएटिव्हिटीसाठी जगभरात ओळखला जातो. ऑक्टोपस फ्लेवर्ड आइस्क्रीम खाणे असो किंवा कडल कॅफेमध्ये जाऊन निवांत क्षण घालवणे असो, जपानमध्ये तुम्हाला प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन आणि विचित्र पाहायला मिळेल. पण तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे का की जपानी लोक इतके क्रिएटिव्ह का आहेत आणि इथे कोणत्या अनोख्या गोष्टी पाहायला मिळतात? जर होय, तर या लेखात आम्ही तुम्हाला जपानबद्दल अशाच काही रंजक आणि विचित्र गोष्टींबद्दल सांगणार आहोत (Fun Facts About Japan). या गोष्टी ऐकून वाचून नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

व्हेंडिंग मशीन

जपानमध्ये व्हेंडिंग मशीन्स इतके प्रचलित आहेत की इथे दर 23 लोकांमागे एक व्हेंडिंग मशीन असल्याचे सांगितले जाते. ही संख्या अंदाजे 5 दशलक्ष व्हेंडिंग मशीन्सच्या समतुल्य आहे. देशात आपण कल्पना करू शकता अशा जवळजवळ प्रत्येक गोष्टीसाठी व्हेंडिंग मशीन आहे. तुम्हाला स्नॅक्स, मॅगझीन, टॉयलेट पेपर, फुले किंवा छत्री खरेदी करायची असली तरी, तुम्हाला फक्त जवळचे वेंडिंग मशीन शोधावे लागेल. जपानमध्ये अनेक व्हेंडिंग मशिन्स असण्यामागे अनेक कारणे आहेत, जसे की कमी गुन्हेगारीचा दर, ऑटोमेशनशी संलग्नता म्हणजे काहीतरी आपोआप काम करणे जेणेकरून आम्हाला ते काम पुन्हा पुन्हा करावे लागणार नाही. उदाहरणार्थ, कपडे धुणारी मशीन, कार बनवणारा रोबोट किंवा कंप्यूटर जो सर्व हिशेब स्वतःच करतो.

ट्रॅव्हल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कडल कॅफे

जपानमध्ये कडल कॅफे फार लोकप्रिय आहेत. इथल्या वेगवान जीवनात, लोकांना अनेकदा थकवा आणि तणाव जाणवतो. अशा स्थितीत हा ताण कमी करण्यासाठी त्यांना कडल कॅफे मदत करतात. या कॅफेमध्ये, लोक व्यावसायिक कडलर किंवा प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवून आराम करू शकतात. हे कॅफे एक सुरक्षित आणि आरामदायी वातावरण प्रदान करतात, जेथे लोक कोणत्याही संकोच न करता निवांत क्षण घालवू शकतात.

ऑक्टोपस आईस्क्रीम

कल्पना करा, तुम्ही आईस्क्रीम पार्लरमध्ये जाता आणि मेनूवर एक अनोखी चव पाहायला मिळते- ऑक्टोपस आइस्क्रीम! होय, तुम्ही ते बरोबर वाचले आहे. जपानमध्ये, ऑक्टोपससह आइस्क्रीम सीफूड प्रेमींसाठी खास मिठाईपेक्षा कमी नाही. ज्यांना अनोखा फूड एक्सपेरियन्स घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ऑक्टोपस आइस्क्रीम हा एक अनोखा अनुभव असू शकतो.

कामाच्यामध्ये पॉवर नॅप

कामाच्या दरम्यान पॉवर नॅप घेणे बहुतेक देशांमध्ये चुकीचे मानले जाते. जर तुम्ही नोकरीवर झोपताना पकडले गेले तर तुम्हाला ओरडा तर पडू शकतोच पण यामुळे तुम्हाला तुमची नोकरीही गमवावी लागू शकते, पण जपानमध्ये असे नाही. होय, येथे कामाच्या दरम्यान झोपणे केवळ कंपन्यांकडून स्वीकारले जात नाही तर ते आदराचे प्रतीक देखील मानले जाते. काम करताना थकवा आल्यावर झोपी जाणारा माणूस खूप मेहनत करतो, अशी इथल्या लोकांची धारणा आहे. काही जपानी कंपन्या तर त्यांच्या कर्मचाऱ्यांना दुपारी अर्धा तास विश्रांतीसाठी देतात. या प्रथेला ‘इनेमुरी’ (Inemuri) म्हणतात.

ट्रॅव्हल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

वाकड्या दातांचा फॅशन

जपानमध्ये एक अनोखा फॅशन ट्रेंड वेगाने उदयास आला आहे, ज्याला ‘येबा’ (Yaeba_) म्हणतात. या ट्रेंडमध्ये, तरुण मुली जाणूनबुजून दात तुटलेले किंवा असमान दिसण्यासाठी डेंटल ट्रीटमेंट घेतात. हे विचित्र दिसले तरी ते जपानी तरुणांमध्ये सौंदर्याचे नवे ट्रेंड बनले आहे. तथापि, ही फॅशन खूपच महाग आहे आणि त्यात अनेक डेंटल सर्जरिजचा समावेश आहे.

Web Title: Japans weird and wonderful from octopus ice cream to cuddle cafes check details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2024 | 09:38 AM

Topics:  

  • Japan

संबंधित बातम्या

Tooth Regrowth Medicine: आता दात पडण्याची भीती कशाला? पुढच्या ४ वर्षांत तोंडात पुन्हा दात उगवणार; जपानचा मोठा चमत्कार
1

Tooth Regrowth Medicine: आता दात पडण्याची भीती कशाला? पुढच्या ४ वर्षांत तोंडात पुन्हा दात उगवणार; जपानचा मोठा चमत्कार

Indian Ecocnomy: २०२५ चा ऐतिहासिक शेवट! जपानला मागे सारत भारत बनली जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था
2

Indian Ecocnomy: २०२५ चा ऐतिहासिक शेवट! जपानला मागे सारत भारत बनली जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.