MahaKumbh 2025: कुंभमेळ्याला जाण्याचा विचार करताय? ऑनलाइन ई-पास कसा मिळवायचा ते जाणून घ्या
हिंदू धर्मात कुंभमेळ्याला फार महत्त्व आहे. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी कुंभमेळा एक आहे. जगभरातील करोडो भाविक या धार्मिक सोहळ्यात सामील होण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून इथे येत असतात. यंदा 13 जानेवारी ते 25 फेब्रुवारी 2025 या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आला आहे.
गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा पवित्र संगम असलेल्या प्रयागराजमध्ये हा कुंभ मेळा सुरु झाला आहे. महाकुंभ मेळ्यासाठी यूपी सरकारकडून विविध सुविधा पुरवल्या जात आहेत. तसेच भाविकांच्या सोयीसाठी ई-पासचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना महाकुंभात प्रवेश करताना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. यूपी सरकारने 6 रंगीत ई-पास जारी केले आहेत. हे पास वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळ्या रंगाचे असतात. रंगीत पासमुळे एखादी व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे हे ओळखणे सोपे होते. जर तुम्हीही महाकुंभ मेळ्याला जाणार असाल आणि तुम्हाला ई-पास हवा असेल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला ऑनलाइन ई-पास बुक करण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
पाकिस्तानला मिळाला सोन्याचा साठा! या नदीत सापडलं प्रचंड सोनं; भारताची ही नदीही उगळते सोनं
ई-पास ऑनलाइन बुक कसे करावे? ? (How To book E-Pass Online for Mahakumbh 2025)
आता जग पाहण्याचे स्वप्न झाले आणखीन सोपे, भारतीयांना 56 देशांमध्ये व्हिसा-फ्री एंट्री
पांढऱ्या रंगाचा ई-पास
पांढऱ्या रंगाचा ई-पास हा उच्च न्यायालय, व्हीआयपी, परदेशी राजदूत आणि अनिवासी भारतीयांसाठी (NRI) यांच्यासाठी जारी करण्यात आला आहे. याच्या मदतीने भाविकांना प्रशासकीय मदत मिळणे सोपे होईल.
भगव्या रंगाचा ई-पास
यासोबतच भगव्या रंगाचा ई-पास हा आखाडे आणि धार्मिक संस्थांसाठी जारी करण्यात आला आहे.
पिवळ्या रंगाचा ई-पास
तर पिवळ्या रंगाचा ई-पास हा दुकानदार, फूड कोर्ट आणि मिल्क बूथ यांसारख्या सुविधांसाठी बनवण्यात आला आहे
आकाश निळ्या रंगाचा ई-पास
हा ई-पास माध्यम कर्मचाऱ्यांसाठी आकाश निळ्या रंगाचा ई-पास राखीव ठेवण्यात आला आहे.
निळ्या रंगाचा ई-पास
पोलीस दलासाठी निळ्या रंगाचा ई-पास जारी करण्यात आला आहे.
लाल रंगाचा ई-पास
त्याचबरोबर आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवांसाठी लाल रंगाचा ई-पास जारी करण्यात आला आहे