Navratri Travel: देवीचे अनोखे शक्तीपीठ जिथे देवी सतीचे पडले होते शीर, या नवरात्रीत एकदा नक्की भेट द्या
देशभरात 3 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी देवीची मोठ्या जोशात आणि जल्लोषात तयारी सुरु आहे. या सणानिमित्त लोक देवीची मनोभावनेने पूजा करत देवीच्या विविध शक्तिपीठांना भेट देत असतात. हिंदू धर्मात शक्तीपीठ अत्यंत पवित्र मानले जाते. या ठिकाणी पवित्र मानले जाते. या ठिकाणी देवीची पूजा केल्याने भक्तांना मोक्ष प्राप्त होतो, अशी भाविकांची धारणा आहे. शक्तिपीठांशी संबंधित अनेक प्रचलित कथा आहे, ज्या भगवान देव आणि देवीशी संबंधित आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शक्तीपीठाविषयी माहिती देत आहोत ज्याचा संबंध देवी सतीशी निगडित आहे.
हिंदू धर्मात शक्तिपीठांना देवी आदिशक्तीचे पवित्र स्थान मानले जाते. या ठिकणी देवी सतीच्या शरीराचे अवयव पडले होते. या ठिकाणी पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार, जेव्हा दक्ष प्रजापतीने भगवान शिवाचा अपमान केला तेव्हा हा अपमान देवी सतीला सहन झाला नाही आणि परिणामी त्यांनी यज्ञकुंडात आत्मदहन केले. क्रोधित होऊन शिवाने दक्षाचा यज्ञ उध्वस्त केला आणि सतीचा मृतदेह घेऊन ब्रह्मांडात फिरू लागले. शिवाच्या विलापावर भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने माता सतीच्या शरीराचे तुकडे केले, जे पृथीवर ठिकठिकाणी पडले. जिथे जिथे सतीचे अवयव पडले तिथे तिथे शक्तीपीठांची स्थापना झाली.
हेदेखील वाचा – निळा-पांढरा-लाल कोणत्या रंगाचा पासपोर्ट आहे जास्त पॉवरफूल? काय आहे या रंगांचा अर्थ? जाणून घ्या
भारतात असे एकूण 51 प्रमुख शक्तीपीठे आहेत. आज आम्ही तुम्हाला देवी सतीच्या अशा एका शक्तिपीठाविषयी सांगत आहोत, जिथे देवी सतीचे शीर पडले होते. अनेकजण नवरात्रीत या शक्तिपीठाला भेट देतात आणि देवीची पूजा करतात. इथे मनोभावनेने देवीची पूजा केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हेदेखील वाचा – भारतातील एक असे रेल्वे स्टेशन जिथून परदेशात जाण्यासाठी ट्रेन धावतात, प्रवासासाठी तिकीट नाही तर पासपोर्ट दाखवावे लागते
कांगड्याच्या धौलाधर डोंगरावर वसलेल्या कुणाल पाथरी येथे सती देवीचे शिर पडल्याचे सांगितले जाते. हे ठिकाण आता कपालेश्वरी मंदिर म्हणून ओळखले जाते. इथे दर्शन घेतल्याने सर्व आजार दूर होतात असे मानले जाते. तसेच इथे येऊन जीवनातील अडथळे दूर होतात असे मानले जाते. तसेच जर तुमची काही इच्छा असेल जी तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्ही या मंदिरात देवीची यथायोग्य पूजा करू शकता.