Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri Travel: कुष्मांडा देवीचे एक अद्भूत मंदिर, इथे पिंडीच्या रूपात आहे देवी विराजमान

भारतातील कुष्मांडा देवीचे मंदिर देशातील अदभूत आणि अनोख्या मंदिरांपैकी एक आहे. इथे देवी पिंडाच्या स्वरूपात विराजमान आहे. या पिंडीतून नेहमी पाणी गळत असते. इथे देवी सतीचे अंशही असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर आपल्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी फार प्रसिद्ध आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 08, 2024 | 09:40 AM
Navratri Travel: कुष्मांडा देवीचे एक अद्भूत मंदिर, इथे पिंडीच्या रूपात आहे देवी विराजमान

Navratri Travel: कुष्मांडा देवीचे एक अद्भूत मंदिर, इथे पिंडीच्या रूपात आहे देवी विराजमान

Follow Us
Close
Follow Us:

नवरात्रीचा उत्सव संपूर्ण देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू झालेल्या नवरात्रीची सांगता नवमी तिथीला होईल. या सणानिमित्त दुर्गा देवीची मनोभावानेने पूजा केली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवस देवीची पूजा करण्याची प्रथा आहे. आज आम्ही तुम्हाला देशातील एका अनोख्या देवीच्या मंदिराबाबत काही अद्भुत गोष्टी सांगणार आहोत. मंदिराची खासियत म्हणजे, या मंदिरात देवी पिंडीच्या रूपात विराजमान आहे. या पिंडीतून सतत पाणी वाहत असते, काय आहे यामागील रहस्य? चला या लेखातून जाणून घेऊयात.

कुठे आहे हे मंदिर?

भारतातील कानपुर जिल्ह्यातील घाटमपूर येथे देवी कुष्मांडाचे मंदिर स्थित आहे. हे मंदिर या ठिकाणचे सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय मंदिर आहे. येथील देवीला कुळा देवी असेही म्हटले जाते. इथे देवी विश्रांती मुद्रेत आहे. दरवर्षी नवरात्रीत मोठी जत्राही भरते. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

हेदेखील वाचा – Navratri Travel: भारतातील एकमेव मंदिर जिथे आहेत देवीची नऊ रूपं, इच्छापूर्तीसाठी प्रसिद्ध

देवी सतीच्या शरीराचा एक भाग पडला होता

कुष्मांडा देवीची ही मूर्ती फार जुनी आणि प्राचीन आहे. देवी कुष्मांडा मंदिराबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. एका प्रचलित पौराणिक कथेनुसार, भगवान शंकर देवी सतीचे शरीर घेऊन फिरत होते, तेव्हा भगवान विष्णूने आपल्या चक्राने माता सतीच्या शरीराचे अनेक भाग केले होते. हे भाग जिथे पडले तिथे तिथे शक्तीपीठे निर्माण झाली आहेत. या ठिकाणी सती देवीचा अंशही पडल्याचे सांगितले जाते.

पिंडीतून सतत वाहते पाणी

या मंदिरात कुष्मांडा देवी पिंडाच्या रूपात विराजमान आहे. मुख्य म्हणजे, या पिंडीतून नेहमीच पाणी वाहत राहते. याबाबत असे मानले जाते की, मंदिरात अर्पण केलेले पाणी अनेक दुःख दूर करते. यासोबतच हे पाणी डोळ्यांना लावल्याने दृष्टीही वाढते.

हेदेखील वाचा – Navratri Travel: देवीचे अनोखे शक्तीपीठ जिथे देवी सतीचे पडले होते शीर, या नवरात्रीत एकदा नक्की भेट द्या

मंदिर कोणी बांधले?

1783 मध्ये कवी उमेदराव खरे यांनी लिहिलेल्या पर्शियन पुस्तकानुसार 1380 मध्ये राजा घटम देव यांनी येथे देवीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या नावावर घाटमपूर हे नगर वसवले. यानंतर हे मंदिराचा पुन्हा 1890 मध्ये चंदीदीन यांनी जीर्णोद्धार केला. नंतर पुढे जाऊन येथे राहणाऱ्या भक्तांनी या जागी मठाची स्थापना केली.

कुष्मांडा मंदिरात कसे जावे?

कुष्मांडा देवीचे हे मंदिर कानपुर येथे स्थित आहे. येथे जाण्यासाठी तुम्ही ट्रेन, बसचा पर्याय निवडू शकता. तुम्ही कानपूर किंवा झकरकाटी बस स्टँडवरून नौबस्ताला थेट टॅक्सी किंवा ऑटो घेऊ शकता. तेथून व्हॅन, टॅक्सी आणि बसने थेट घाटमपूरला जात येते. या मंदिरात कुष्मांडा देवीव्यतिरिक्त राम, सीता आणि लक्ष्मण यांची मूर्ती स्थित आहे. तसेच इथे हनुमानाचीही एक मोठी मूर्ती स्थित आहे.

Web Title: Navratri travel goddess kushmanda temple goddess in form of pindi secret of the constant flow of water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 09:40 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.