नवरात्रीचा उत्सव देशभर मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. या सणानिमित्त अनेकजण देवीची पूजा करतात. तसेच याकाळात देवीच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट दिली जाते. तुम्हीही या नवरात्रीत देवीच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट देण्याचा विचार करत असाल तर आजही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला देशातील एका अनोख्या देवीच्या मंदिराविषयी माहिती सांगत आहोत. हे देशातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रचलित मंदिर आहे. विशेष म्हणजे, हे मंदिर असे एकमेव मंदिर आहे, जिथे देवीची नऊ रूपे एकत्र बघायला मिळतात. असे मानले जाते की, या मंदिराला भेट दिल्यानंतर माणसाच्या शारीरिक आणि मानसिक ताणतणाव दूर होतात.
शारदीय नवरात्र हा दुर्गा देवीची उपासना करण्याचा विशेष काळ आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या विविध नऊ रूपांचे ध्यान आणि पूजा केली जाते.धार्मिक मान्यतेनुसार, जे कोणी नवरात्रीच्या या नऊ दिवसांत देवीची मनोभावनेने पूजा करतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटाची पूजा केली जाते. आईचे हे रूप शांती आणि कल्याण प्रदान करणारे मानले जाते.
हेदेखील वाचा – Navratri Travel: देवीचे अनोखे शक्तीपीठ जिथे देवी सतीचे पडले होते शीर, या नवरात्रीत एकदा नक्की भेट द्या
पौराणिक कथेनुसार देवी भगवतीने राक्षसांचा नाश करण्यासाठी हे रूप धारण केले होते. तिच्या कपाळावर अर्धचंद्र असल्यामुळे देवीचे नाव चंद्रघंटा आहे. देवीचे रूप अलौकिक आहे. तिचे शरीर सोन्यासारखे चमकते. देवी चंद्रघंटाला दहा हात आहेत, त्यात शस्त्रे सजवली आहेत. प्रत्येक देव-देवताकडे एक वेगळे वाहन आहे त्यानुसार देवी चंद्रघंटाचे वाहन सिंह आहे.
हेदेखील वाचा – निळा-पांढरा-लाल कोणत्या रंगाचा पासपोर्ट आहे जास्त पॉवरफूल? काय आहे या रंगांचा अर्थ? जाणून घ्या
नवरात्रीत चंद्राघंटाच्या मंदिराला आवर्जून भेट द्या. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर प्रयागराजमधील सर्वात प्रसिद्ध आणि गर्दीचे ठिकाण मानले जाते. हे देवी क्षेमा आईचे अतिशय प्राचीन मंदिर आहे. पुराणात या मंदिराचा विशेष उल्लेख असल्याचे सांगितले जाते. इथे दुर्गादेवी चंद्रघंटाच्या रूपात येथे विराजमान आहे. या मंदिरावर भक्तांची नितांत श्रद्धा आहे. मनापासून या मंदिरात काही मागितले की आपली इच्छा पूर्ण होते अशी स्थानिक लोकांची मान्यता आहे. चंद्रघंटा देवीची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि जीवनात सुख-समृद्धी येते असे सांगितले जाते.