Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या देशांमधील पाणीपुरीच्या किमतींनी मोडला विक्रम! फ्रान्समध्ये आहे इतकी किंमत एवढ्या पैशात एकवेळचं जेवण होईल

पाणीपुरी हे एक असे भारतीय स्ट्रीट फूड आहे ज्याचा दबदबा फक्त भारतातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? इतर देशात या चटपटीत पाणीपुरीची किंमत काय आहे?

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 31, 2024 | 09:42 AM
या देशांमधील पाणीपुरीच्या किमतींनी मोडला विक्रम! फ्रान्समध्ये आहे इतकी किंमत एवढ्या पैशात एकवेळचं जेवण होईल

या देशांमधील पाणीपुरीच्या किमतींनी मोडला विक्रम! फ्रान्समध्ये आहे इतकी किंमत एवढ्या पैशात एकवेळचं जेवण होईल

Follow Us
Close
Follow Us:

भारत जगभर आपल्या ऐतिहासिक ठिकाणांसाठी आणि चवदार खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. पाणीपुरी हे भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. याचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटू लागते. क्वचितच असं कोणी असेल ज्याला पाणीपुरी आवडत नसेल. भारतातील जवळपास प्रत्येक राज्यात पाणीपुरी उपलब्ध आहे. पण तुम्हाला माहित आहे का? जगातील अनेक देशांमध्येही पाणीपुरीचा दबदबा आहे. होय, आता हे भारतीय स्ट्रीट फूड परदेशातही पाहायला मिळतात.

परदेशी लोकांसाठी हे एक नवीन फूड आहे, जे ते मोठ्या उत्साहाने खातात आणि याचा आनंद लुटतात. भारतात, पाणीपुरीची प्लेट किमान 10 रुपये किंवा जास्तीत जास्त 50 किंवा 100 रुपयांना मिळते. पण इतर देशांबद्दल बोललो तर येथील पाणीपुरीची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. चला तर मग जाणून घेऊयात जगातील इतर देशांमध्ये पाणीपुरीची किंमत किती आहे.

हेदेखील वाचा – नीता अंबानींना जगातील सर्वात महागड्या ठिकाणी जायला आवडते, एका रात्रीचे भाडे तब्बल 62 लाख रुपये!

युनायटेड किंग्डम

युनायटेड किंगडममधील लोकांना पाणीपुरी खूप आवडते. इथेही स्ट्रीट फूड आहे. येथे एका प्लेटमध्ये 6 पाणीपुरी दिल्या जातात. ज्याची किंमत 3.5 डॉलर आहे. भारतीय रुपयानुसार एकूण 6 पाणीपुरींची किंमत 300 रुपये आहे.

चीन

पाणीपुरीची चव चायनीज लोकांच्या जिभेवरही पोहोचली आहे. हळूहळू हे स्ट्रीट फूड आता चीनच्या रस्त्यांवरही प्रसिद्ध होत आहे. येथे 6 पाणीपुरीची किंमत 4 डॉलर असल्याचे सांगितले जाते. भारतीय रुपयानुसार 6 पाणीपुरी खाण्यासाठी तुम्हाला 350 रुपये खर्च करावे लागतील.

हेदेखील वाचा – Shortest Journey: फक्त 74 सेकंदात पूर्ण होतो प्रवास! जगातील सर्वात लहान विमान प्रवासाबद्दल माहिती आहे का?

कॅनडा

कॅनडात समोसा आणि डोसा खूप प्रसिद्ध असला तरी आता इथेही पाणीपुरीने आपला ठसा उमटवला आहे. अनेक भारतीय कॅनडात राहतात, त्यांना त्याची चव चाखायला मिळते. पण इथे भारतात पाणीपुरी खाणे तितके स्वस्त नाही. इथे 6 पाणीपुरी खायची असेल तर 5 डॉलर खर्च करावे लागतील. भारतीय रुपयांनुसार येथे 6 पाणीपुरी 450 रुपयांना मिळतील.

जपान

जपानी लोकांमध्येही पाणीपुरी लोकप्रिय आहे. येथे काही ठिकाणी त्याचे स्टॉल्स तुम्हाला पाहायला मिळतील. येथे 6 पाणीपुरीची किंमत 6 डॉलर आहे. भारतीय रूपयांमध्ये पाहिले तर त्याची किंमत 520 रुपये आहे. याचा अर्थ जपानमध्ये थाळीपेक्षा पाणीपुरी खाणे महाग आहे.

यूएसए

अमेरिकेत मोठ्या संख्येने भारतीय लोक राहतात. काही भारतीयांनी तर इथे पाणीपुरी बनवायला सुरुवात केली आहे, त्यामुळे अमेरिकनांमध्येही या स्ट्रीट फूडची मागणी वाढली आहे. जर तुम्ही अमेरिकेत असाल आणि पाणीपुरी खायची असेल तर 7 पाणीपुरीसाठी तुम्हाला 7 डॉलर खर्च करावे लागतील. म्हणजे 600 रु. जरा कल्पना करा, तुम्हाला इतकी महागडी पाणीपुरी खायला आवडेल का?

फ्रांस

पाणीपुरीच्या किमतीच्या बाबतीत फ्रान्सने इतर देशांना मागे टाकले आहे. येथे 8 पाणीपुरीची किंमत $14 आहे. भारतानुसार 1089 रु. म्हणजे एका थाळीच्या पाणीपुरीच्या किमतीत भारतीय कुटुंब हॉटेलमध्ये जेवण करू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की पाणीपुरी हे फक्त भारतातच नाही तर जगभरात सर्वाधिक आवडले जाणारे स्ट्रीट फूड आहे. त्याची किंमत प्रत्येक देशात वेगळी असते. काही देशांनी जास्त मागणी असल्याने या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.

Web Title: Pani puri is breaking records in these countries know about the list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2024 | 09:41 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.