विमानातून प्रवास करणे हे प्रत्येक सामन्याचे स्वप्न असते. आयुष्यात एकदा तरी विमानाने प्रवास करावा असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र विमानाचा प्रवास महाग असल्याने अनेकजण विमान प्रवासाकडे दुर्लक्ष करतात. मात्र आता प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आजकाल विविध कंपन्या विमान प्रवासाकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स देत आहेत.
तसं पाहायला गेलं तर फ्लाइटचा प्रवास हा अधिकतर जास्त पल्ल्याच्या प्रवासातही केला जातो. याच्या मदतीने अनेक मोठमोठे प्रवास तुम्ही काही तासांतच पूर्ण करू शकता. मात्र आज आम्ही तुम्हाला विमानाच्या अशा एका प्रवासाबद्दल माहिती सांगत आहोत, जो फक्त 74 सेकंदात पूर्ण होतो… हा जगातील सर्वात लहान प्रवास म्हणून ओळखला जातो. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – ट्रेनच्या किमतीत मिळेल फ्लाइट तिकीट! फक्त फॉलो करा ‘ही’ सोपी पद्धत
फक्त 74 सेकंदाचा प्रवास
आम्ही तुम्हाला आज अशा एक प्रवासाविषयी सांगत आहोत, जो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी फक्त 74 सेकंदाचा अवधी घेतो. ही जगातील सर्वात लहान उड्डाण आहे, जी Loganair द्वारे चालवला जातो. स्कॉटलंडमधील वेस्ट्रे आणि पापा वेस्ट्रेच्या ऑर्कने बेटांदरम्यान हे फ्लाइट उडते. या अनोख्या स्कॉटिश फ्लाइटने आपला संपूर्ण प्रवास अवघ्या दीड मिनिटात पूर्ण केला. या फ्लाइटची माहिती समोर येताच ती सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय बनली. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
या फ्लाइटची माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. याचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात म्हटले आहे की, या दोन ठिकाणांमधील अंतर कापण्यासाठी या फ्लाइटला कधीकधी 1 मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो. आतापर्यंत नोंदवलेला सर्वात कमी वेळ 53 सेकंद आहे. हा उत्कृष्ट विक्रम पायलट स्टुअर्ट लिंकलेटरच्या नावावर आहे. या मार्गावरील फ्लाइट्स 1967 मध्ये सुरू झाली होती, ज्याने जगातील सर्वात कमी विमान प्रवासाचा विक्रम मोडला आहे. ही फ्लाइट फक्त शनिवारी सुरु नसते, इतर दिवशी ती चालू असते.
हेदेखील वाचा – Diwali 2024: केवळ भारतातच नाही तर या देशांमध्येही दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे
यात स्टुअर्ट लिंकलेटरने आतापर्यंत 12, 000पेक्षा अधिक वेळा हे विमान घेऊन यात प्रवास केला आहे, जो आतापर्यंतचा एक मोठा विक्रम असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. सर्वात जलद उड्डाण वेळेचा विक्रम अजूनही लिंकलेटरच्या नावावर आहे. हे विमान अवघ्या काही सेकंदातच 2.7 किलोमीटर अंतर कापते. या विमानाबाबतची माहिती @aviation_heaven नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. हा व्हिडिओ शेअर होताच याने अनेकांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.