डिसेंबर महिन्यात थंडी वाढते, आणि याच महिन्यात ख्रिसमस व नवीन वर्षाचा उत्सव साजरा केला जातो. 31 डिसेंबरला 2024 वर्षाला गुड बाय म्हणत नवीन वर्षाचे स्वागक केले जाते. नवीन वर्षाच्या सुरुवातील लोक अनेक संल्प करतात. नवीन ध्येयांशी स्वत:ला जोडतात. अशा वेळी हा क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी अनेकजण फिरायला जातात.
तुम्ही देखील कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असला हा कालावधी कुटुंबीय, मित्रमंडळी किंवा जोडीदारासोबत खास बनवण्यासाठी उत्तम आहे. तुम्ही कमी बजेटमध्ये (₹5000-7000) प्रवासाचा विचार करत असाल, तर खालील ठिकाणांचा विचार करू शकता. तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत, पार्टनरसोबत या ठिकाणांना भेट देऊ शकता.
चला तर मग जाणून घेऊयात अशा ठिकाणांबद्दल
मसूरी-धनौल्टी
उत्तराखंडचे मसूरी हिल-स्टेशन बर्फाच्छादित सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला जर बर्फात खेळण्याचा आनंद लुटायचा असेल तर या ठिकाणाला भेट देऊ शकता. यासाठी तुम्हाला देहरादूनपासून मसूरीपर्यंत खाजगी टॅक्सी किंवा बसने पोहोचता येते. मसूरीमध्ये माल रोड, लाल टिब्बा, कंपनी गार्डन, आणि हैप्पी व्हॅलीला भेट देऊ शकता. धनौल्टी व सुरकंडा देवी मंदिराचा प्रवास दुसऱ्या दिवशी करू शकता. येथे हॉटेल्स किंवा होम स्टे ₹1000-₹1500 पर्यंत उपलब्ध आहेत.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नैनीताल
दिल्लीहून काठगोदामपर्यंत ट्रेनचा खर्च फक्त ₹300-₹400 आहे. काठगोदामपासून नैनीतालला ₹100 मध्ये बस मिळते. या ठिकाणी तुम्ही नैनी लेकची बोटिंग, नैना देवी मंदिर, आणि स्नो व्ह्यू पॉइंट या मुख्य आकर्षणांचा आनंद घेऊ शकता. तुम्हाला केवळ ₹1000 मध्ये उत्तम होम स्टे येथे मिळू शकतो. नैनीताल हा शांतता व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी योग्य ठिकाण आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
हे देखील वाचा- IRCTC चा धमाकेदार टूर पॅकेज: कमी खर्चात घ्या दुबई आणि अबू धाबी फिरण्याचा आनंद
जैसलमेर
जैसलमेरमध्ये दोन दिवसांचा प्रवास पुरेसा आहे. सैम सैंड ड्यून्स, कुलधारा गाव, जैसलमेर किल्ला, गडीसर लेक, पटवों की हवेली, आणि ऊंट सफारी यामुळे तुमचा प्रवास अविस्मरणीय होईल. अगदी कमी बजेटमध्ये येथे निवास व्यवस्था सहज उपलब्ध आहेत.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
चकराता
उत्तराखंडमधील चकराता एक शांत व निसर्गरम्य हिल स्टेशन आहे. देहरादूनहून येथे पोहोचण्यासाठी फक्त ₹100 खर्च येतो. टायगर फॉल्स, कनासर, यमुना ॲडव्हेंचर पार्क, आणि बुधेर गुहा यांसारख्या ठिकाणी दोन-तीन दिवसांत सहज फिरता येते.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
चला चर मग विचार काय करताय. कमी बजेटमध्ये या ठिकाणांना भेट द्या आणि तुमचा ख्रिसमस व नवीन वर्ष खास बनवा. आता लगेच तुमचा प्लॅन ठरवा आणि सुंदर आठवणी तयार करा.