ही 5 ठिकाणं आहेत ऐतिहासिक अवशेषांच्या सौंदर्याची उदाहरणं, वास्तुकला आणि कोरीव काम पाहून आश्चर्यचकित व्हाल
जगात असे काही ऐतिहासिक अवशेष आहेत ज्यांचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. त्यांची अनोखी वास्तू आणि नक्षीकाम त्यांना अद्वितीय बनवते. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 ऐतिहासिक अवशेषांबद्दल सांगणार आहोत. या ऐतिहासिक अवशेषांना सौंदर्याचे उदाहरण मानलं जात. त्यांचे कोरीव काम आणि वास्तुकला पाहून खरंच आश्चर्य वाटते. या सौंदर्याने नटलेल्या प्राचीन अवशेषांमध्ये माचू पिचू, अंगकोर वाट, कोलोझियम, चिचेन इत्झा आणि पेट्रा यांचा समावेश आहे.
हेदेखील वाचा- मुलांना रस्त्याच्या कडेला सोडून पालक जातात डेटवर! ‘या’ देशातील विचित्र परंपरा ऐकूण आश्चर्य वाटेल
जगभरात असे अनेक अवशेष आहेत जे आज इतिहासाची पाने उलटतात. हे अवशेष केवळ प्राचीन संस्कृतींच्या कला आणि स्थापत्यशास्त्राबद्दलच सांगत नाहीत तर त्या काळातील जीवन आणि संस्कृतीबद्दलच्या अनेक रहस्यमय गोष्टींची माहिती देतात. आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच 5 आश्चर्यकारक अवशेषांबद्दल सांगणार आहोत. हे अवशेष अत्यंत प्राचीन असेल तरी देखील त्यांचे सौंदर्य आजही पाहण्यासारखे आहे. जगातील अशाच काही ऐतिहासिक अवशेषांबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
पर्वतांच्या मधोमध असलेले हे अवशेष इंकन सभ्यतेचे अप्रतिम उदाहरण आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे त्याची बनावट, जो पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल. प्राचीन काळाच माचू पिचू कसे बांधले गेले असेल याची कल्पनाही करणे कठीण आहे. रहस्यमय रचना आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले माचू पिचू जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक मानले जाते. माचू पिचूच्या आजूबाजूला उंच पर्वत आहेत, जे तिचं सौंदर्य आणखी वाढवतात.
कंबोडियामध्ये असलेले हे मंदिर 12 व्या शतकात बांधले गेले. हे राजा सूर्यवर्मन याने बांधले होते. अंगकोर वाटच्या वास्तुकला आणि कोरीव कामाची उदाहरणे देणे अत्यंत अवघड आहे. त्याची विशालता आणि जटिल वास्तुकला पाहण्यासाठी नक्की भेट द्या.
हेदेखील वाचा- बंगालमध्ये न जाता दुर्गा पूजा अनुभवण्याची इच्छा आहे? तर दिल्लीतील या प्रसिद्ध मंडळांना नक्की भेट द्या
हे प्राचीन रोमचे सर्वात मोठे ॲम्फीथिएटर होते आणि येथे ग्लॅडिएटरच्या लढाई झाल्या. हे रोमन साम्राज्याच्या सामर्थ्याचे आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते. जगातील सात आश्चर्यांमध्येही याचा समावेश करण्यात आला आहे. कोलोझियम अत्यंत प्राचीन असला तरी त्याचे सौंदर्य आजही कायम आहे.
मेक्सिकोच्या युकाटन द्वीपकल्पावर असलेले हे अवशेष माया संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र होते. खगोलशास्त्र आणि गणिताचा समावेश असलेली त्याची जटिल रचना शास्त्रज्ञांसाठीही एक रहस्य बनली आहे. पूर्वी ते अर्थव्यवस्था आणि राजकीय समस्यांचे केंद्र मानले जात होते. चिचेन इत्झाच्या सभोवतालचे सौंदर्यही पाहण्यासारखे आहे.
लाल दगडांनी बनलेले पेट्रा हे गुप्त शहर नबताई लोकांचे होते. त्यचे सौंदर्य आणि अद्वितीय वास्तुकला हे हॉलिवूड चित्रपटांसाठी एक आवडते ठिकाण बनवते. हे रॉक-कट आर्किटेक्चरचे एक अनोखे उदाहरण आहे, जे पाहण्यासाठी लोक लांबून येतात. त्याचे सुरेख नक्षीकाम त्याचे सौंदर्य आणखी वाढवते.