मुलांना रस्त्याच्या कडेला सोडून पालक जातात डेटवर! 'या' देशातील विचित्र परंपरा ऐकूण आश्चर्य वाटेल
जरा कल्पना करा, तुम्ही अशा देशात आहात जिथे मुलं मोकळ्या रस्त्यावर स्ट्रोलर्समध्ये झोपली आहेत आणि त्यांचे पालक एका रोमँटिक डेटवर गेले आहेत. असं दृश्य पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. आपल्या मनात अनेक प्रश्न देखील निर्माण होतील. पण असा एक देश आहे जिथे पालक आपल्या मुलांना रस्त्याच्या कडेला स्ट्रोलर्समध्ये ठेऊन डेटवर जातात. आम्ही डेन्मार्कबद्दल बोलत आहोत जिथे असे दृश्य दिसणं अगदी सामान्य आहे. ही डेन्मार्कमधली प्रथा आहे. ही प्रथा ऐकूण आपल्याला जरी आश्चर्य वाटत असलं तरी तेथील नागरिकांसाठी अगदी सामान्य आहे.
हेदेखील वाचा- बंगालमध्ये न जाता दुर्गा पूजा अनुभवण्याची इच्छा आहे? तर दिल्लीतील या प्रसिद्ध मंडळांना नक्की भेट द्या
डेन्मार्कमधील या विचित्र प्रथेमध्ये मुले स्ट्रोलरमध्ये आरामात झोपतात, तर त्यांचे पालक कोणतीही चिंता न करता चांगले क्षण घालवण्यासाठी बाहेर जातात. या काळात ते रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकतात किंवा प्रवासाचा आनंद देखील घेऊ शकतात. या विचित्र परंपरेमागील कारण आणि त्याच्याशी संबंधित मनोरंजक गोष्टींबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
युरोपातील सुंदर देश डेन्मार्कमध्ये एक अनोखी परंपरा पाहायला मिळते. इथल्या लोकांना मोकळ्या आकाशाखाली आपल्या मुलांना स्ट्रोलरमध्ये झोपवून काही क्षणांचा आनंद लुटायला आवडते. डेन्मार्कमध्ये अगदी सहज पाहायला मिळणार दृष्य म्हणजे लहान मुले रस्त्याच्या कडेला स्ट्रोलर्समध्ये आरामात झोपली आहेत, आणि त्यांचे पालक जवळच्या कॅफेमध्ये कॉफीचा आनंद घेत आहेत. हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु डेन्मार्कमध्ये ही पूर्णपणे सामान्य गोष्ट आहे. हिवाळा कितीही कडक असला तरी आपल्या मुलांना मोकळ्या हवेत झोपवण्यावर येथील लोकांचा विश्वास आहे.
डेन्मार्कमध्ये लहान मुलांना रस्त्यावर झोपवण्याची पद्धत आहे. कोपनहेगनच्या रस्त्यांवर स्ट्रोलर्समध्ये झोपलेली मुले पाहून परदेशी पर्यटकांना अनेकदा आश्चर्य वाटते. ताजी हवा लहान मुलांसाठी फायदेशीर आहे, असे येथील लोकांचे मत आहे, त्यामुळे मुलांना उघड्यावर झोपवण्यास त्यांना अजिबात संकोच वाटत नाही.
हेदेखील वाचा- Hotel Check-out Mistakes: हुशार लोकंही हॉटेल चेक आऊटवेळी करतात या 6 चुका
डेन्मार्कचे लोक जेवणानंतर आपल्या मुलांना स्ट्रोलरमध्ये झोपवतात आणि रस्त्याच्या कडेला सोडतात, पण प्रश्न असा आहे की डेन्मार्कचे लोक आपल्या मुलांना रस्त्याच्या कडेला झोपवण्यावर विश्वास का ठेवतात? वास्तविक, या देशात 3 वर्षांपर्यंतच्या मुलांना मोकळ्या हवेत झोपवण्याची प्रथा खूप जुनी आहे. असे मानले जाते की ताजी हवा मुलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण मिळते.
डेन्मार्कमधील सुईणी आणि बाळ परिचारिका देखील पालकांना त्यांच्या बाळांना मोकळ्या हवेत झोपवण्याचा सल्ला देतात. येथील लोकांचा असा विश्वास आहे की मुलांना ताज्या हवेत वेळ घालवल्याने अनेक फायदे मिळतात. हिवाळ्यात, मुलांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी स्ट्रॉलरमध्ये उबदार ब्लँकेट ठेवल्या जातात. विशेष म्हणजे पालक आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत खूप दक्ष असतात. ते स्ट्रॉलरमध्ये बेबी मॉनिटर बसवतात जेणेकरून ते मुलावर लक्ष ठेवू शकतील. ही परंपरा बरीच जुनी असल्याने येथे लहान मुलांचे अपहरण होण्याची भीती कमी आहे.