places for senior citizens: रिटायरमेंटनंतर भारतातील या ठिकाणांना नक्की भेट द्या, आनंद होईल द्विगुणित
तरूणाई असो किंवा सिनियर सिटीझन, प्रवास हा प्रत्येकाला आनंद देतो. नवीन ठिकाणी जाणं, त्यांना भेट देणं, हा एक सुखद अनुभव असतो. मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नवनवीन ठिकाणी प्रवास करणं, एक चांगला मार्ग आहे. कामाच्या व्यापात आपण इतके गुंतलेले असतो, की आपल्याला नवीन ठिकाणी जाण्याची संधीच मिळत नाही. मग अशावेळी सर्वांना आवडणारा मार्ग म्हणजे रिटायरमेंटनंतर फिरायला जाणं. तुम्ही रिटायरमेंटनंतर भारतातील अनेक ठिकाणं एक्सप्लोअर करू शकता. या सुंदर आणि परवडणाऱ्या स्थळांना भेट देऊन, तुम्ही निवृत्तीनंतरच्या आयुष्यातील सुंदर क्षणांचा आनंद लुटू शकाल. (फोटो सौजन्य – pinterest)
Year Ender 2024: फॅमिली वेकेशनसाठी भारतातील या 10 ठिकाणांना मिळाली पहिली पसंती, तुम्ही भेट दिली का?
ऋषिकेश- उत्तराखंडच्या ऋषिकेशला योग आणि अध्यात्माचे केंद्र म्हटले जाते. येथे तुम्ही गंगेच्या काठावर बसून शांतीचा अनुभव घेऊ शकता किंवा आश्रमांमध्ये योगसाधनेचा आनंद घेऊ शकता. कमी बजेटमध्ये हे एक उत्तम डेस्टिनेशन आहे.
उदयपूर- राजस्थानमधील उदयपूर शहराला तलावांचे शहर म्हटले जाते. येथील तलाव, राजवाडे आणि राजेशाही संस्कृतीने तुमचे मन हरवून जाईल. या ठिकाणी सिटी पॅलेस, फतेहसागर तलाव आणि स्थानिक बाजार पाहण्यासारखे आहेत. हे ठिकाण अतिशय परवडणारे आणि शांत आहे.
पाँडिचेरी- तामिळनाडूमध्ये असलेले पाँडिचेरी हे फ्रेंच वास्तुकलेसाठी आणि समुद्र किनाऱ्यावर निवांत क्षण घालवण्यासाठी योग्य आहे. येथील कॅफे आणि समुद्रकिनारे तुम्हाला खूप आराम देतील.
महाबळेश्वर- महाराष्ट्रातील महाबळेश्वर हिल स्टेशन थंड हवामान आणि स्ट्रॉबेरी फार्मसाठी प्रसिद्ध आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरणामुळे तुम्हाला नवीन उर्जा मिळेल. तुम्ही या ठिकाणी कोणत्याही ऋतूत भेट देऊ शकता.
कसौली- हिमाचल प्रदेशातील कसौली हे एक छोटेसे पण अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. या ठिकाणी असलेली थंड हवा आणि नैसर्गिक दृश्य यामुळे तुमचं मन अगदी आंनदित होईल.
वाराणसी- उत्तर प्रदेशातील वाराणसी हे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. गंगा आरती, मंदिर दर्शन आणि घाटावर घालवलेला वेळ तुम्हाला आध्यात्मिक शांती देईल. याशिवाय, येथे तुम्हाला रस्त्यावरील विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येईल.
गोवा- गोवा हे केवळ तरुणांसाठीच नाही तर वृद्धांसाठीही उत्तम ठिकाण आहे. निवृत्तीनंतरही तुम्ही इथे येऊन समुद्रकिनाऱ्यावर निवांत क्षण घालवू शकता. इतकंच नाही तर इथली स्थानिक संस्कृती तुम्हाला आवडेल.
Solo Trip: लग्नानंतर महिलांसाठी सोलो ट्रीप का गरजेची? फायदे वाचून व्हाल चकित
शिलाँग- मेघालयची राजधानी शिलाँग आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते. धबधबे, पर्वत आणि हिरवाई ही येथील मुख्य आकर्षणे आहेत. हिवाळ्यात हे ठिकाण खूप सुंदर दिसते.
धर्मशाला- हिमाचलची धर्मशाला तिबेटी संस्कृती आणि निसर्ग सौंदर्याचा संगम आहे. हे ठिकाण विश्रांती आणि शांततेसाठी योग्य आहे. तुम्ही इथे शांततेत वेळ घालवू शकता.
अलेप्पी- केरळमधील अलेप्पी हे बॅकवॉटर हाउसबोट्ससाठी प्रसिद्ध आहे. हिरव्यागार वातावरणात तुम्हाला इथे एक अनोखा अनुभव घेता येईल. हे ठिकाण तुम्हाला वेगळ्या जगाचा अनुभव देईल.