हिमाचल प्रदेशाच्या कुशीत वसलंय महादेवाचे तुंगनाथ मंदिर! सप्टेंबर-ऑक्टोबरच्या वातावरणात नक्की भेट द्या (फोटो सौजन्य - pinterest)
हिमाचलच्या भव्य दऱ्यांमध्ये तुंगनाथ मंदिर वसलेलं आहे. महादेवाचं हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात असणाऱ्या या मंदिराला तुम्ही सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये भेट देऊ शकता. कारण या काळात मंदिराच्या परिसरातील वातावरण अतिशय आल्हाददायक असते. तुम्हाला जर चोपटा-तुंगानाथला भेट द्यायची असेल किंवा तुम्हाला येथे ट्रेकिंगसाठी जाायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे.
हेदेखील वाचा- झपाट्याने वाढतोय Sleep Tourism चा ट्रेंड! पर्यटनस्थळांचा आंनद घेण्यासाठी नाही, झोप घेण्यासाठी होतोय प्रवास
देवभूमी उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात असलेले तुंगनाथ मंदिर हे जगातील सर्वात उंच शिव मंदिर आहे. तुंगनाथ मंदिर हे हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र आणि प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे. येथून तुम्ही हिमालयातील सुंदर दऱ्या पाहू शकता आणि शांत वातावरणात निसर्ग जवळून अनुभवू शकता.असे मानले जाते की हे मंदिर पांडवांनी बांधले होते. एका पौराणिक कथेनुसार, महाभारत युद्धातील नरसंहारानंतर पांडव आपल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी हिमालयाच्या प्रवासाला निघाले आणि यावेळी त्यांनी तुंगनाथ येथे भगवान शंकराची तपश्चर्या केली आणि येथे शिवलिंगाची स्थापना केली.
पंच केदारपैकी एक असलेल्या तुंगानाथला जाण्यासाठी दुर्गम रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. साधारणपणे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात येथील हवामान अधिक चांगले असते, त्यामुळे या महिन्यांत तुम्ही मंदिराला भेट देऊ शकता. तुंगनाथ मंदिरात जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. तुम्ही येथे विमान, रेल्वे किंवा रस्त्याने प्रवास करू शकता.
हेदेखील वाचा- कुटूंबासोबत विकेंड प्लॅन करताय? सप्टेंबरमध्ये वीकेंड गेटअवेसाठी ‘ही’ हिल स्टेशन ठरतील बेस्ट
तुंगनाथला जाण्याचा सर्वात सोयीचा मार्ग म्हणजे हवाई मार्ग. डेहराडूनचे जॉली ग्रांट विमानतळ तुंगनाथसाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे. विमानतळावरून चोपट्याजवळील पांगर गावात जावे लागते. हा प्रवास सुमारे 220 किलोमीटरचा असेल आणि तो पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सुमारे 9 तासांचा कालावधी लागेल. जर तुम्हाला ट्रेनने प्रवास करायचा असेल तर तुम्ही डेहराडून, हरिद्वार किंवा ऋषिकेशला जाऊ शकता. तुंगनाथसाठी ही सर्वात जवळची रेल्वे स्थानके आहेत. या स्थानकांवरून तुम्ही बस किंवा टॅक्सीने चोपट्यापर्यंतचा प्रवास करू शकता.
जर तुम्ही तुमच्या कारने प्रवास करत असाल तर तुम्हाला दिल्लीहून डेहराडून किंवा हरिद्वार मार्गे पांगर गावात जावे लागेल. पांगरहून तुम्ही चोपट्यापर्यंत स्थानिक वाहतूक वापरू शकता. ऋषिकेश ते तुंगानाथ हे अंतर अंदाजे 209 किलोमीटर आहे.तुंगानाथ मंदिरात आरतीची निश्चित वेळ नाही. कारण हे मंदिर खूप उंचावर आहे आणि येथील हवामान अचानक बदलू शकते. याशिवाय येथे येणाऱ्या भाविकांची संख्या ऋतू आणि दिवसाच्या वेळेनुसार बदलते. पहाटेची आरती पहायची असेल तर मंदिर उघडण्याच्या वेळेनंतर कधीतरी पोहोचावे. साधारणपणे, मंदिर सकाळी 5:00 ते 6:00 दरम्यान उघडते. संध्याकाळची आरती मंदिर बंद होण्याच्या काही वेळापूर्वी होते.
तुंगनाथ मंदिराला भेट द्यायची असल्यास , मे ते जून आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यानचा काळ सर्वोत्तम आहे. या काळात हवामान आल्हाददायक राहते आणि तुम्ही सहज ट्रेकिंग करू शकता. नोव्हेंबरमध्ये देवतांच्या प्रस्थानाबरोबरच मंदिराचे दरवाजेही बंद होतात. हिमालयातील प्रचंड बर्फवृष्टीमुळे येथे जाणे कठीण होते, त्यामुळे मंदिर बंद होते.