झपाट्याने वाढतोय Sleep Tourism चा ट्रेंड! पर्यटनस्थळांचा आंनद घेण्यासाठी नाही, झोप घेण्यासाठी होतोय प्रवास (फोटो सौजन्य - pinterest)
धावपळीच्या जीवनात लोकांना आराम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी लोकं आजारी पडतात. बिझनेसमॅन, नेते, कलाकार, फिल्मस्टार, यासांरख्या अनेक लोकांना काहीवेळा त्यांच्या कुटूंबासाठी देखील वेळ मिळत नाही. त्यामुळे आता याच सर्व परिस्थितीत लोकं फिरायला जाऊन किंवा एखाद्या पर्यटन स्थळी जाऊन आराम करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत लोकं एखाद्या पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी किंवा त्या पर्यटनस्थाळाचा इतिहास जाऊन घेण्यासाठी त्या ठिकाणी जात होती. मात्र आता लोकं आपली झोप पूर्ण करण्यासाठी पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत. या ट्रेंडला Sleep Tourism ट्रेंड असं नाव देण्यात आलं आहे.
हेदेखील वाचा- परदेशात जायचंय पण पैशांचं टेन्शन आलंय? वापरा टॉप 10 मनी हॅक! होईल पैशांची बचत
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या नेटवर्किंग हेडने त्याचा अनुभव सांगितला आहे. त्याने सांगितलं आहे की, एका दिवसात 25 तास कधी असतील याची वाट पाहत आहे, जेणेकरून मी माझा एक तास फक्त कुटुंब आणि विश्रांतीच्या नावावर देऊ शकेल. कंपनीकडून अनेक सुट्या आहेत, पण रजा घेण्याची संधी नाही. कसा तरी वेळ सापडला आणि आठवडाभरासाठी मी माझ्या कुटुंबासह गोव्याला गेलो, त्यामुळे तिथे फिरण्याऐवजी मी दिवसभर फक्त झोपायचे ठरवले. मित्रांनी मला टोमणे मारले की मी झोपायला इतके दूर गेलो, ज्याला माझे एकच उत्तर होते – ती माझी झोप होती. अगदी सुट्टीला जाऊन, थकून परत येणं आणि मग पुन्हा ऑफिस ते घर या चक्रात अडकणं यात काही मजा नाही.
हेदेखील वाचा- Best Tiger Parks: ही आहेत भारतातील 6 फेमस टायगर पार्क्स! मित्रांसोबत नक्की भेट द्या
भारतीय लोंक आता Sleep Tourism ट्रेंडच्या दिशेने वळताना पाहायला मिळत आहेत. तसेच हॉस्पिटॅलिटीच्या जगाने झोपेच्या पर्यटनाचा कल झपाट्याने वाढवला आहे. जिथे लोक प्रवास करण्यापेक्षा विश्रांती, पुरेशी झोप आणि जगाच्या गजबजाटासाठी रिचार्जिंगकडे अधिक झुकतात. नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या मते, कमी झोप आणि नैराश्य यांचा थेट आणि खोल संबंध आहे. एक काळ असा होता की दिवसभर हॉटेलच्या खोलीत झोपणे हा पर्यटकांचा वेळ वाया घालवणारा मानला जात होता. पण आता पर्यटनस्थळी जाऊन फिरण्यापेक्षा लोकं झोपेला अधिक महत्त्व देत आहेत. आयुर्वेदिक उपचारांपासून पौष्टिक आहारापर्यंत अनेक सुविधांसह Sleep Tourism चा ट्रेंड वेगाने वाढत आहे.
चांगली झोप ही एक लक्झरी गोष्ट बनत आहे आणि संपूर्ण जगासाठी ही चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत, भारतीय तसेच भारतात येणारे परदेशी पाहुणे येथील हॉटेल्समध्ये उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांद्वारे त्यांच्या विश्रांतीची बुकिंग करत आहेत. आयुर्वेद, योग, ध्यान, जलचिकित्सा, मसाज थेरपी यासारख्या सेवा हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. ही पारंपारिक तंत्रे चांगल्या झोपेवर तसेच संपूर्ण आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतात. त्यामुळेच येथे स्लीप टुरिझमची मागणी वाढत आहे.
केरळच्या गडगडणाऱ्या धबधब्यांपासून ते हिमालयाच्या निर्मळ खोऱ्यांपर्यंत तुम्हाला चांगली झोप हमखास मिळते, तर अनेक पंचतारांकित हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये उपलब्ध साउंडप्रूफ रूम्स, आयुर्वेदिक स्लीप थेरपी, अरोमाथेरपी यांसारख्या झोपेच्या सोयी आणि AI सहाय्यक बेड आणि हिप्नोथेरपिस्ट तुम्हाला शाही झोप देतात.