
नागपूर. राज्य सरकारच्या सूचनेनुसार शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नवीन लॉकडाऊन (lockdown) मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जिल्हाअधिलकाऱ्यांनी आदेश जारी करून लॉकडाऊन 12 जुलैपर्यंत वाढविला(extend) आहे. म्हणजे आता 12 जुलै पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी 4 वाजता सगळे दुकाने बंद होतील.
[read_also content=”स्कर्ट घालायला आवडतं?; मग असा निवडा परफेक्ट स्कर्ट https://www.navarashtra.com/latest-news/like-to-wear-a-skirt-then-choose-the-perfect-skirt-nrng-150277.html”]
संध्याकाळी 4 नंतर हॉटेल, रेस्टॉरंट्सची पार्सल सुविधा देखील बंद केली गेली आहे, परंतु होम डिलिव्हरी सुरू राहील. शनिवार व रविवारी दुकाने व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा वगळता सर्व काही बंद राहील.
राज्यात डेल्टा, डेल्टा प्लस या कोव्हिडच्या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. २८ जून सकाळी ७ वाजतापासून लागू करण्यात आलेले नियम ५ जुलैला सकाळी ७ पर्यंत लागू आहेत. नवे नियम ५ जुलैला सकाळी ७ पासून १२ जुलै सकाळी ७ पर्यंत लागू राहणार आहेत. नागपूरसाठी तिसऱ्या टप्प्यातील नियम लागू असून सायंकाळी ५ नंतर अत्यावश्यक कामे वगळता कुणीही बाहेर पडू नये, असे बदल नव्या आदेशात करण्यात आले आहेत.