अंबरनाथ एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात दलालांचा सुळसुळाट झाला असून, प्लॉट चार ते पाच पट दराने विकले जात असल्याचा आरोप अतिरिक्त अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनने पत्रकार परिषदेत केला. संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी एमआयडीसी प्रशासनावर जमीन अधिग्रहणापूर्वीच थेट विक्री करण्याचा आरोप करत, त्यामुळे उद्योजक आणि जमीन मालकांमध्ये वाद निर्माण होऊन उद्योग उभारणीला तीन-चार वर्षांचा विलंब होतो, असे सांगितले. ही परिस्थिती कायम राहिल्यास अंबरनाथ एमआयडीसीतील सुमारे १४०० कंपन्या परराज्यात स्थलांतरित होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला उमेश तायडे यांच्यासह संघटनेचे सचिव परेश शहा, खजिनदार लिकार सिंग, जनसंपर्क अधिकारी विजय नायर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.