डोंबिवली स्टार कॉलनी परिसरात खराब रस्त्यामुळे नागरीक आणि वाहन चालकाना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तीन महिन्यापूर्वी स्टार कॉलनी चाैकात रस्त्याचे काम सुरु झाले होते. हा रस्ता तयार करण्यात आलेला नाही. या रस्त्यावर खोदकाम केल्याने प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना नागरीकांना सहन करावा लागत आहे. महिला आणि विद्यार्थी वर्गाला त्याचा जास्त त्रास होत आहे. कंत्राटदाराने माहितीची फलक लावलेला नाही. याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी जागरुक नागरीक शशिकांत कोकाटे यांनी केली आहे. या समस्येचा व्हीडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.