धुळे तालुक्यातील गरताड परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पिकांचे नुकसान करणाऱ्या डुकरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून डुकरांमुळे बाजरी, मका आणि भुईमूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. संबंधित मालकांकडे वारंवार विनंती करूनही काहीच कारवाई झाली नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तक्रार करूनही प्रशासन मौन बाळगत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप पसरला आहे. शेतकरी सुधाकर पाटील यांनी आता प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.