खचू नका,सुनील शेळके तुमच्या पाठीशी! आंध्रा धरणाच्या प्रश्नावर शेळकेंचा भावनिक संवाद

Maval News: “कुणी कितीही खचलं तरी मी खचत नसतो... तुम्हीही खचू नका. हा सुनील शेळके तुमच्या पाठीशी कधीही कमी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आंध्रा धरण पाईपलाईनच्या संवेदनशील प्रश्नावर बोलताना आमदार सुनील शेळके यांचा भावनिक अंदाज पाहायला मिळाला.दिवंगत अजितदादा पवारांच्या कार्यपद्धतीची आठवण सांगत शेळकेंनी मावळकरांना आणि कार्यकर्त्यांना धीर दिला.“कुणी कितीही खचलं तरी मी खचत नसतो... तुम्हीही खचू नका. हा सुनील शेळके तुमच्या पाठीशी कधीही कमी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आंध्रा धरणाच्या पाण्याच्या प्रश्नावर संघर्ष सुरू असताना “काळजी करू नका, मी करून देतो,” या शब्दांत शेळकेंनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केलं.