Maval News: उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस, हृदयविकारावरील उपचार, अत्यावश्यक निदान सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि इतर उपचार सुविधा पूर्ण क्षमतेने उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार सुनील शेळके यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, धरणग्रस्त आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि जनसामान्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांनी स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या बाफना यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तीव्र दुःख…
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, मावळ तालुक्याचे सुपुत्र, मावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी महसूल व परिवहन राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे सोमवारी (दि. १४) वयाच्या ८५ व्या वर्षी आजारपणामुळे निधन…
मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, सरपंच व उपसरपंचांसह एकूण सहा ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्याचा आदेश पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.
मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथून अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने मावळ तालुक्यात खळबळ उडाली असून, बालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा…
पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपीची मावळ न्यायालयाने जेलमध्ये रवानगी केली आहे.
मावळ तालुक्यातील वराळे येथे जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार करून तसेच दगडाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 30) पहाटेच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात प्रशांत शिंगाडे याचा मृत्यू…
मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने तळेगाव एसटी आगाराला प्राप्त झालेल्या पाच नव्या ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट एसटी बसेसचे लोकार्पण आमदार सुनील शेळके…
संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रात आपल्या दमदार कामगिरीने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘ओम्या’ बैलाचे आज, दिनांक २७ रोजी दुपारच्या सुमारास दुःखद निधन झाले.
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील मायमर रुग्णालयात प्रसूतीदरम्यान एका ३८ वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नवजात बाळाचाही मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मावळ तालुक्यातील ऑर्डव गावात स्मशानभूमी नसल्यामुळे एका मृत व्यक्तीवर भर पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. मुसळधार पाऊस सुरू असताना हृदय हेलावून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले.
Maval Landslide: मावळ तालुक्यातील विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाटण गावात झालेल्या भूस्खलनात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले की, पाटण गावाचा यापूर्वी भूस्खलनप्रवण…
पाटण गावात घडलेल्या दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
पावसामुळे पुणे–मुंबई एक्सप्रेसवे, जुना पुणे–मुंबई महामार्ग, रेल्वे मार्ग तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Pavana Pipeline Project : स्थानिक शेतकरी आणि नागरिकांचा विरोध अद्याप कायम असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शासनाने प्रकल्पाला हिरवा कंदील दिल्यास मावळात पुन्हा मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली…
मावळ तालुक्यातील सर्वाधिक वादग्रस्त प्रकल्पांपैकी एक असलेला पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प तब्बल दीड दशकानंतर पुन्हा चर्चेत आला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत या प्रकल्पासंदर्भात हालचाली सुरू आहेत.
मावळ तालुक्यातील विकासकामांना गती देण्यासाठी पंचायत समिती मावळ येथे सर्व विभागांची सविस्तर शासकीय आढावा बैठक पार पडली. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखावा आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता…
मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरात कंपनीच्या प्लांटमध्ये अचानक झालेल्या कार्बन डायऑक्साइड गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.