पुण्यामध्ये चक्क ईव्हीएम मशीनची पूजा करण्यात आली. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिला उमेदवारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. महिला उमेदवारांनी गुन्हा दाखल करण्यात आला.
मावळ तालुक्यातील वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झाले आहे. मात्र निकाल लांबणीवर पडल्याने स्ट्रॉग रुममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळमध्येही राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजकीय पक्षांनी देखील मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.
Maharashtra Local Body Election : वडगाव मावळमध्ये आजपर्यंत म्हणजेच १३ नोव्हेंबरपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे वडगावच्या राजकारणात उत्सुकता आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रभाग आरक्षण जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून, इच्छुक उमेदवारांनी पक्षाचे तिकीट मिळण्याची वाट न पाहता थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रचार मोहिमेचा धडाका लावला आहे.
वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारांची चढाओढ सुरू झाली आहे. नगरसेवक पदासाठी तब्बल ४८ इच्छुकांचे अर्ज, तर नगराध्यक्ष पदासाठी ४ अर्ज दाखल झाले आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मावळ तालुक्यामध्ये पाच पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार आहेत.
वडगाव मावळ नगरपंचायतीच्या विकास आऱाखड्यामध्ये ३० कोटी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप मनसेचे माजी तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांनी केला.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तरात सांगितले की, पकडलेले गुन्हेगार दीड वर्ष तुरुंगात होते. नंतर बेल मिळाल्यावर त्यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले.