अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींचा अतिरिक्त तपास करण्यासाठी आता एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
निविदा प्रक्रियेचा कालावधी लक्षात घेता, नागरिकांचे जीव धोक्यात येऊ नयेत यासाठी तात्काळ डागडुजीचे काम सुरू करावे, अशी ठाम मागणी आमदार सुनील शेळके यांनी केली.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तरात सांगितले की, पकडलेले गुन्हेगार दीड वर्ष तुरुंगात होते. नंतर बेल मिळाल्यावर त्यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येणार आहे. याबाबत आमदार सुनील शेळके यांनी आश्वासन दिले आहे.
वडगाव मावळमध्ये आमदार सुनील शेळके यांनी जनता दरबारचे आयोजन केले होते. यामध्ये त्यांनी जनतेच्या प्रश्नांचे आणि समस्यांचे निराकरण केले. त्यावेळी जनतेचा मोठा उत्साह होता.
राज्यामध्ये विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये वडगाव मावळचे आमदार सुनील शेळके यांनी प्रश्न मांडून मतदारासंघासाठी अनेक विकासकामांची मागणी केली आहे.
लोणावळा शहरातील प्रमुख प्रलंबित कामांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय होऊनही नगरपरिषद प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईवर आमदार सुनील शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
नागरिकांनी रेल्वे लाईनच्या बाजूला मटका अड्डा सुरू असल्याने खूप त्रास होत असल्याच्या तक्रारी आमदार शेळके यांच्याकडे मांडल्या. त्यामुळे आमदार शेळके यांनी मटका अड्डा चालवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांसमोर रंगेहाथ पकडून पोलिसांच्य
रिंग रोड प्रोजेक्ट हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांशी प्रकल्प आहे. त्याच्या पुर्णत्वामध्ये जमीन दिलेल्या लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक घेण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळमध्ये जोरदार प्रचार सुरु आहे. सुनील शेळके यांचा जोरदार प्रचार केला जात असून महिला वर्ग त्यांच्या पाठीशी आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या विकासकामांना आणि दाव्यांवर अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी थेट आव्हान दिले आहे.
नव्या राजकीय समीकरणानुसार अनेक मतदारसंघात महायुतीत बंडखोरी बघायला मिळाली. ही बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश प्राप्त झाले. परंतु काही ठिकाणी बंडखोर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत.
कुठल्याही परिस्थितीत दमदाटीला, धमक्यांना, लोभाला बळी पडू नका. आपण केलेल्या कामाच्या जोरावर हक्काने महायुतीची उमेदवारी मिळवली आहे आणि आपण पक्षाचे तसेच महायुतीचे काम करतोय, असे महादूबुवा कालेकर म्हणाले.
जनतेच्या विश्वासावर आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत. शनिवारी वडगाव मावळ येथे ग्रामदैवत पोटोबा महाराजांच्या आशीर्वाद घेऊन महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती शेळके यांनी दिली.
मावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन पक्षाने निर्णय घेतला, तर काय होतं हे सांगलीकरांनी दाखवून दिलं. हा दाखला देत मावळ विधानसभेतही बंडखोरी होऊ शकते, याचे स्पष्ट संकेत बाळा भेगडेंनी दिल्याने महायुतीत ठिणगी…