डोंबिवली येथील सावरकर रोडवरील भाजप कार्यालयात रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळाला. डोंबिवलीचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यावेळी भगिनींसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेनुसार यंदाही मोठ्या संख्येने भगिनी भाजप कार्यालयात उपस्थित राहिल्या. यावेळी शेकडो भगिनींनी रविंद्र चव्हाण यांच्या हातावर राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. भगिनींच्या उपस्थितीमुळे भाजपच्या सावरकर रोड कार्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला.