Rohit Achrekar kargil to dombivli journey completed: डोंबिवलीतील रोहित आचरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘एक बंधन, रक्षाबंधन’ हा देशभक्तीपर उपक्रम गेल्या २० वर्षांपासून राबवला जात आहे.
डोंबिवलीतील सम्राट चौकात दीपेश म्हात्रे फाउंडेशनतर्फे ‘स्वराज्य काला महोत्सव’ भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नशामुक्ती आणि नारीशक्तीचा संदेश देत उत्सवाचा उत्साहात शुभारंभ झाला.
आधुनिक जीवनशैलीत लोप पावत चाललेल्या वैदिक परंपरा आणि संस्कार जपण्यासाठी डोंबिवलीत सलग तिसऱ्या वर्षी श्रावणी उपकर्म उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उत्सवात सुमारे २०० ब्राह्मण कुटुंबीय सहभागी झाले असून, वैदिक…
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेनुसार यंदाही रक्षाबंधनाच्या सणानिमित्त मोठ्या संख्येने भगिनी भाजप कार्यालयात उपस्थित राहिल्या. यावेळी शेकडो भगिनींनी रविंद्र चव्हाण यांच्या हातावर राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली पश्चिमेतील कोपरगाव येथे पर्यावरणपूरक पंचगव्य गणपतीच्या मूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नैसर्गिक घटकांपासून तयार होणाऱ्या या मूर्तीमुळे पर्यावरण संवर्धनासोबतच पारंपरिक श्रद्धेचीही जपणूक होणार आहे.
डोंबिवलीतील मोठा गणेश घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला अखेर…
डोंबिवलीतील मोठा गणेश घाट परिसराच्या विकासाला आता वेग मिळत आहे. घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासोबतच रो-रो जलवाहतूक प्रकल्पाचे कामही अंतिम टप्प्याकडे जात असून, नागरिकांना लवकरच सुरक्षित आणि जलद प्रवासाची सुविधा मिळण्याची…
मुंबईमधील डोंबिवलीत डॉक्टरांवर आणि कर्मचाऱ्यांवर एका नगरसेवकांने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच घडलेला होता. या हल्ल्याच्या विरोधात आज सांगली आणि मिरज मधील डॉक्टरांनी एकत्र येत या विरोधात आवाज उठवत किल्लारीकारी…
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गंभीर अवस्थेतील एका चिमुकल्याच्या उपचारांदरम्यानचा कथित निष्काळजीपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठली असून आरोग्य सुविधांबाबत गंभीर…
डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर भाजपच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाला भेट देत वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. डॉक्टर आणि नर्सच्या सुरक्षेसाठी तसेच रुग्णालयातील सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे…
डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ७० वर्षीय पंडित वाघ हे धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा तोल गेला आणि ते प्लॅटफॉर्म व चालत्या लोकलमधील धोकादायक फटीत अडकण्याच्या…
कल्याण-डोंबिवली परिसरात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. दोघी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. मानपाडा आणि रामनगर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तिन्ही अत्याचार प्रकरणांमुळे…
इर्शाळवाडी ट्रेकदरम्यान डोंबिवलीतील २० वर्षीय रितेश कोणका याचा अचानक मृत्यू झाला. ट्रेक करताना त्याची प्रकृती बिघडली. ग्रामस्थांनी मदत केली, मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
अटल सेतूवर उडी मारून आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या मृत्यूला अडीच वर्षे झाली तरी कुटुंबाला मृत्यू दाखला मिळालेला नाही. हद्द वादामुळे प्रक्रिया रखडली असून पत्नीने अखेर हायकोर्टात धाव घेतली आहे.
डोंबिवलीतील ३ वर्षांपूर्वीच्या हत्येप्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी नांदेडमध्ये शेतमजूर बनून राहत असताना अटक केली. पोलिसांनीही वेषांतर करून ५ दिवस गुप्त शोधमोहीम राबवत आरोपीला जेरबंद केले.
कल्याण ग्रामीणचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी डोंबिवलीत शासन आपल्या दारी या शिबीराचे आयोजन केले. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कौतुक केले.
डोंबिवली पूर्वेतील दत्तनगरमधील प्रगती कॉलेजमध्ये लायब्ररी शिपाई प्रवीण चौधरी यांनी चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. प्राचार्यांसोबत चर्चा सुरू असताना त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
डोंबिवलीमध्ये अपघातात जखमी झालेल्या तरुणाला मदत करण्याच्या बहाण्याने रिक्षातून हॉस्पिटलकडे नेत असताना त्याच्याच गळ्यातील सोन्याची चैन लुटण्यात आली. विष्णूनगर पोलीस स्टेशनने आरोपीला आजदे गावातून अटक करून चैन हस्तगत केली.