गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील चिरचाडबांध येथे गौण खनिज खान आहे. या खाणीमधून मोठ्या प्रमाणामध्ये ओव्हरलोड असलेले टिप्पर गिट्टी घेऊन या परिसरातून जात असतात यामुळे चिरचाड बांध, खुर्शीपार, या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यामध्ये रस्ता शोधूनही सापडत नाही अनेक शालेय विद्यार्थी शाळेत येत असताना या ठिकाणी पडतात, अनेक रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी न्यायासाठी मोठा त्रास सहन करायला लागतो अशी परिस्थिती असताना स्थानिक जनप्रतिनिधी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदने दिली परंतु अद्यापही या निवेदनाचे दखल घेण्यात आले नाही आणि त्यात आज दोन विद्यार्थी या ठिकाणी पडले आणि जखमी झाले त्यामुळे त्रस्त झालेल्या परिसरातील गावातील नागरिकांनी काही काळ या भागामध्ये चक्काजाम आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.