भारतीय सैन्य दलात २४ वर्ष प्रदीर्घ सेवा केल्यानंतर सेवानिवृत्ती घेऊन गावी परतलेल्या हवालदार सचिन दगडू मोरे यांचे पालगड फाटा ते राणेमाची येथे मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले आहे. भारत माता की, जय जवान जय किसान, अश्या घोषणा देत व भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा हातात घेऊन, सचिन मोरे यांची रथ मधून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पालगड,धामणी , घेरा पालगड वरसई, येथील गावकऱ्यांनी ठिक ठिकाणी मिरवणूक थांबून त्यांचे औक्षण व सत्कार केले. आगळ्यावेगळ्या जोशामध्ये, स्वागत करत समस्त राणेमाची संभाजीनगर विभाग व ग्रामस्थांच्या व मित्र परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला.