कळंबोलीत वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी नागरिकांनी एकत्र येत ‘नो गुटखा, नो ड्रग्स’अभियान राबवले. या अभियानांतर्गत नागरिकांनी नशामुक्त कळंबोलीसाठी सामूहिक शपथ घेतली. तसेच परिसरातील अमली पदार्थांच्या विक्रीवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली.