मुंबईतील मलाड रेल्वे स्थानकावर शनिवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. लोकल ट्रेनमधून उतरताना झालेल्या क्षुल्लक वादातून एका प्राध्यापकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. आलोक सिंग असे मृत प्राध्यापकाचे नाव असून, आरोपी ओमकार शिंदे याने त्यांच्या पोटात चाकू भोसकला. गंभीर जखमी अवस्थेत सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने पलायन केले होते, मात्र रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे रेल्वे परिसरात खळबळ उडाली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या आरोपीची बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्यात सखोल चौकशी सुरू आहे.