"तेव्हा ऐतिहासिक शपथविधी सोहळा होईल"; पाहा काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहिर करण्यात आलेलं आहे. याचपार्श्वभूमीवर राधाकृृष्ण विखे पाटील यांनी महायुतीचा विजय असल्याचं म्हटलं आहे. विखे पाटील म्हणाले की, आमचा सगळ्यांचा देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा आहे. जेव्हा फडणवीस शपथ घेतील तेव्हा हा ऐतिहासिक शपथविधी सोहळा होईल असं राधाकृृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे.