Raigad News: रायगडमध्ये भातशेतीची दयनीय अवस्था; मंत्री भरत गोगावले यांनी केली पाहणी
Raigad News: भातशेतीची सद्यस्थिती जाणून घेतल्यानंतर पालकमंत्री भरत गोगावले यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यातील भातशेतीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.
रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी संभाव्य दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाडमध्ये भातशेतीची पाहणी केली. पावसाअभावी भेगाळलेली जमीन आणि पळज स्वरूपात आलेले भाताचे पीक पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. महाड येथे झालेल्या या पाहणीदरम्यान शेतकरी, प्रांताधिकारी, तहसीलदार आणि कृषी अधिकारी उपस्थित होते.