बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी आमदार गोपीचंद पडळकरांवर वादग्रस्त घोषणा करत ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या फोटोंना जोडे मारत जोरदार निषेध नोंदवला.दुसरीकडे राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांच्या फोटोंना कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक घालत त्यांच्याप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. राज्यात पडळकर यांच्या विधानानंतर निर्माण झालेल्या वादाला बदलापुरातही मोठा ऊत आला आहे.