'तिसरी आघाडी' या संस्थेने महाविकास आघाडीला (MVA) धक्का देत भाजपला पाठिंबा जाहीर केला. ठाकरे गटाच्या 'मशाल' चिन्हावर लढणाऱ्या सात उमेदवारांनी बंडाळी केल्याने राजकीय वातावरण तापले.
केंद्रीय मंत्रिमंडळाने देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी एकाच दिवशी चार महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मोदी सरकारने १९,९१९ कोटी रुपयांच्या चार प्रमुख प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
बदलापूरच्या विकासात भाजपचे मोठे योगदान असून आम्ही केलेल्या विकासकामांमुळे बदलापूरची जनता भाजपचाच नगराध्यक्ष करेल असा विश्वास माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी व्यक्त केला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपने भाकरी फिरवली आहे. निवडणुकीच्या तोंडावर बदलापूरात पक्षप्रवेश केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
अखेर बदलापूर ते अक्कलकोट बससेवा सुरु करण्यात आली आहे. यामुळे स्वामी भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चला जाणून घेऊयात, या बस सेवेचे तिकीट किती असेल?
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरप्रकरणी पोलिसांना दिलासा. न्यायमूर्ती दिलीप भोसले आयोगाने स्वसंरक्षणाचा दावा मान्य करत पोलिसांना क्लीनचीट दिली आहे.
बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी आमदार गोपीचंद पडळकरांवर वादग्रस्त घोषणा करत ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
मध्यरात्रीपासूनच पावसाने मुंबई, उपनगर आणि राज्यातील इतर भागात जोरदार बॅटींगला सुरुवात केली आहे. मुबंई आणि उपनगरांना पावसाने अक्षर: झोडपून काढले आहे. अशातच आता बदलापुरमधील उल्हासनदीचं पाणी धोक्याच्य़ा पातळीपर्यंत आली आहे.
अंधत्व निवारणाच्या मोहिमेत गेली 34 वर्ष समाजकार्य करणारे बदलापुरातील साकीब गोरे यांनी आता जागतिक क्रांतीच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलय. त्यांनी आपल्या व्हिजन फ्रेंड साकिब गोरे या संस्थेच्या माध्यमातून अवघ्या…
बदलापुरात चुकीच्या भूसंपादनाची नोंद रद्द झाल्याने स्वानंद अर्णव गृहसंकुलातील रहिवाशांनी आनंदोत्सव साजरा केला व संघर्षात साथ देणाऱ्यांचा सत्कार करून आभार मानले.
Akshay Shinde Encounter Case Update: बदलापूर बलात्कार कथित प्रकरणी एन्काऊंटर झालेल्या अक्षय शिंदे प्रकरणात मोठी घडामोडी समोर आली आहे. अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दणका दिला.
सात महिन्याच्य़ा या बाळावर तब्बल सहा वेळा विविध शस्त्रक्रिया देखील झाल्या आहेत. मात्र या सर्व प्रकाराला बदलापूरातील मल्टीस्पेशालिटी खासगी रुग्णालय जबाबदार आहे असा गंभीर आरोप बाळाच्या पालकांनी केला आहे.
बदलापूर ते कर्जत मार्गावर तिसरी आणि चौथी लाईन टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गिका १,५१० कोटी रुपये खर्चून बांधले जाईल. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) हा प्रकल्प राबवत आहे.
बदलापुरातील उल्हास नदीत बुडून चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. धुळवड खेळल्यानंतर रंग काढायला गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने चौघंही बुडाल्याचं सांगिंतलं जात आहे.
उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 395 वी शिवजयंती साजरी केली जाणार आहे. यासाठी राज्यभरामध्ये पूर्वसंध्येला मोठा उत्साह दिसून येत आहे. बदलापूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.