‘रनवे 34’ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांच्या नव्या चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि रकुलप्रीत सिंह यांचा ‘रनवे 34’ (Runway 34) हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाचा ट्रेलर (Runway 34 Trailer Launch) आज लाँच करण्यात आला. अमिताभ बच्चन अजय देवगणच्या रनवे ३४ (Amitabh Bachchan And Ajay Devgan) या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटातून अजय देवगण दिग्दर्शनाच्या विश्वात पदार्पण करणार आहे. चित्रपटाचे नाव आधी मेडे असे ठेवण्यात आले होते. मात्र नंतर ते बदलून रनवे ३४ (Runway 34) असे ठेवण्यात आले. अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) पायलटची भूमिका साकारताना दिसणार आहेत. यूट्यूबर कॅरीमिनाटी म्हणजेच अजय नागर या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन व्यतिरिक्त अजय देवगण, कॅरिमिनाटी, बोमन इराणी आणि रकुलप्रीत सिंग यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘रनवे 34’ चित्रपट २९ एप्रिलला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.