सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला असून शिवसेना (शिंदे गट) ने निर्णायक विजय मिळवला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांचा 170 मतांनी पराभव करत नगराध्यक्ष पदावर आपले नाव कोरले आहे.या निवडणुकीत मोहोळ नगरपरिषदेच्या 20 पैकी तब्बल 9 जागा शिवसेनेने जिंकत जोरदार मुसंडी मारली असून तालुक्यात शिंदे गटाचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. या निकालामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोहोळमध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेत त्यांनी भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांना थेट इशारा देत “मोहोळ तालुक्यात दादागिरी खपवून घेतली जाणार नाही,” असे ठणकावून सांगितले होते. त्यांच्या या इशाऱ्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.