खाते वाटप झाल्यावर महिनाभर पालकमंत्रीपदाची निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे पालकमंत्री पदाची निवड कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील पालकमंत्र्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी पुन्हा एकदा उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री निवडीची यादी शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. पुन्हा एकदा पालकमंत्री म्हणून उदय सामंत यांची निवड झाल्याने स्थानिक आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.